यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यावर अंकुश लावल्याने सट्टाकिंग हाफीज शेठ चंद्रपूर जिल्ह्यात?
पोलीस पंचनामा भाग – ७
ठाणेदार गोपाल भारती यांच्या भ्रष्ट लीला भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेपर्यंत पौहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व त्या क्षेत्रातील उपविभागीय पोलीस अधिकारी अनभिज्ञ का ? हा प्रश्न निर्माण होत आहे, नव्हे त्यांची मूकसंमती ठाणेदार गोपाल भारती यांना असल्यानेच ठाणेदार हे अवैध धंदेवाईक यांचे रक्षक बनून माल सूतो अभियानात तल्लीन झाले आहे, गडचांदूर परिसरात अशी सुद्धा चर्चा आहे की ठाणेदार आपल्या कमाई चा हिस्सा हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतात.
ठाणेदार गोपाल भारती यांच्या हप्ता वसुलीमुळे गडचांदूर परिसरात अवैध दारू तस्कर, सट्टपट्टी चालविणारे, सुगंधीत तंबाखू विकणारे हे खुलेआम धंदा करीत असताना आता तर चक्क वणी येथील अट्टल सट्टाकिंग हाफीज शेठ हे आपल्या ताफ्यासह उद्याच्या शुक्रवारला गाडेगाव विरूर परिसरात कोंबडा बाजार भरविणार असल्याची धक्कादायक बाब चर्चेत असल्याने ठाणेदार भारतीनेच या कोंबडा बाजारसाठी संमती दिली असल्याचे बोलल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावल्याने व वणीतील उपविभागीय पोलीस अधिकारी हे सुद्धा प्रामाणिक असल्याने वणीत आपली डाळ सिजणार नाही या भीतीने कुख्यात सट्टाकिंग हे भ्रष्ट ठाणेदार गोपाल भारती यांच्याशी संगनमत करून शुक्रवार पासून गाडेगाव वीरुर येथे मोठ्या प्रमाणात कोंबडा बाजार भरविणार असल्याची चर्चा आहे. यामधे उपविभागीय पोलिस अधिकारी नायक यांची काय भूमिका आहे? हे लवकरच कळणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या संदर्भात निवेदन पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे देवून अवैध धंदेवाईक यांना सरक्षण देणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकारी भारती व इतरांवर कायदेशीर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.