Home मुंबई पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसे उमेदवार ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भरला नामांकन...

पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसे उमेदवार ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी भरला नामांकन अर्ज.

 

एका बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्याच हस्ते भरला उमेदवारी अर्ज.

पुणे, 11 नोव्हेंबर:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील अधिकृत उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात एका बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने विधानभवन येथे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. रुपाली पाटील यांनी सोशल डिस्टनसिंगचे नियम पालन करत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.

सध्या बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला असताना केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष त्याच्या सोडवणुकीसाठी काहीच पावले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे बेरोगारीच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रुपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

अनुराधा घुगे या बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्या हस्ते उमेदवारी अर्ज भरीत त्यांनी सर्वच बेरीजगार पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचा संदेश दिला आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसासाठी पदवीधर सन्मान योजना लागू करावी, सर्वच शिक्षण संस्थांमध्ये कमवा व शिका योजना राबवावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.

बेरोजगार तरुणी अनुराधा घुगे म्हणाली, माझे आई-वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. खूप काबाडकष्ट करून त्यांनी मला शिक्षण दिले. मात्र आता इतके उच्च शिक्षण घेतल्यानंतर ही कुठेही नोकरी मिळत नाहीय.
आज उतारवयात माझ्या आई-वडिलांची त्या कामातून सुटका करण्याची जबाबदारी माझी होती, मात्र नोकरी मिळत नसल्याने मी त्यांच्यावर भार बनले आहे. ताईंनी मला नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. माझ्याप्रमाने सर्वच पदवीधरांसाठी त्या चांगले काम करू इच्छित आहेत, तरी सर्व पदवीधरांनी त्यांच्या पाठीशी मतरुपी उभे रहावे असे आवाहन त्यांनी पदवीधर युवकांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here