Home चंद्रपूर खळबळजनक :- नकोडा वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर हजारो ब्रास रेतीचा साठा कुणाचा...

खळबळजनक :- नकोडा वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर हजारो ब्रास रेतीचा साठा कुणाचा ?

 

रेती तस्करांना तहसीलदार, मंडळ, अधिकारी पटवारी यांचा आशीर्वाद?

घूग्गूस प्रतिनिधी :-

घूग्गूस नकोडा परिसरात रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून तहसीलदार मंडळ अधिकारी आणि पटवारी यांच्या आशीर्वादाने रेती तस्कर सैराट झाल्याचे चित्र आहे, अशातच नकोडा वर्धा नदी च्या चिंचोली घाटावर हजारो ब्रास रेती चा साठा असल्याची खळबळजनक माहिती समोर येत असून तो रेती साठा नेमका कुणाचा ? यावर तर्कवीतर्क लावले जात आहे, दररोज रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हायवा ट्रकानी दुसऱ्या जिल्ह्यात 35000 ते 40000 रुपये दराने रेती हायवा ट्रक विकल्या जात असून या रेती तस्करीत कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असल्याची माहिती आहे.
खरं तर तहसीलदार गौण्ड आणि त्यांच्या महसूल अधिकारी कर्मचारी चमुने अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या खऱ्या पण काही मोजके रेती तस्कर आजही त्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करीचा कोट्यावधीचा धंदा करीत असल्याने चिंचोली रेती घाटावरील रेती साठा जप्त होणार की रातोरात तो रेती साठा तस्कर गायब करणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleधक्कादायक :- काँग्रेस नेते संजयभाऊ मारकवार यांचे अपघातात दुःखद निधन.
Next articleखळबळजनक :- एका अभियंत्याच्या त्या अश्लील विडिओ स्टेट्सने उडाली खळबळ ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here