Home चंद्रपूर धक्कादायक :- 200 युनिट वीज बिलाच्या प्रश्नावरून आमदार जोरगेवारच्या तोंडाला फासले काळे...

धक्कादायक :- 200 युनिट वीज बिलाच्या प्रश्नावरून आमदार जोरगेवारच्या तोंडाला फासले काळे ?

 

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा आक्रोश आता उग्ररूप धारण करणार?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले असे संत सांगून गेले पण बोले तसा न चाले त्याच्या तोंडावर काळे ?

असा नवा ट्रेंड सद्ध्या राजकारणात सुरू झाला जो खऱ्या अर्थाने खोटे आश्वासन देवून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना एक सबक ठरणार आहे, असाच एक प्रसंग सद्ध्या चंद्रपूर जिल्ह्यात घडत असून जनतेला 200 युनिट वीज बिल माफ करावे असे निवडणुकीच्या अगोदर बोलणारे किशोर जोरगेवार हे चक्क निवडून आल्यानंतर त्या प्रश्नांवर गप्प असल्याने संतापलेल्या एका कार्यकर्त्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्या बैनेर वरील फोटोच्या तोंडावर काळे फासून जाहीर निषेध केला.

किशोर जोरगेवार यांनी विधानसभा निवडणुकी अगोदर चंद्रपूरच्या जनतेच्या विविध समस्या व प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले होते व धरणे प्रदर्शन मोर्चा रॅलीच्या माध्यमातून विरोध प्रदर्शन करून आपला विज उत्पादक जिल्हा आहे. विज उत्पादकासाठी आपण जागा, पाणी देतो आणि चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्र यासह जिल्ह्यातील इतर वीज निर्मिती केंद्रातून चंद्रपूर जिल्हयात जल वायु प्रदुषन होते यामुळेच चंद्रपूर जिल्हा वांशियांना विविध आजार होत आहे अर्थात त्यामुळे जिल्हा वाशीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला 200 युनिट वीज मोफत द्या तो आमचा अधिकार आहे अशा आशयाचे बैनेल होर्डिंग शहरात लावून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या संदर्भात आपल्याकडे जनतेला आकर्षित केले होते व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने न भूतो न भविष्यती असा विजय मिळवून देवून किशोर जोरगेवार यांना आमदार बनवले. जनतेला वाटले की आता किशोर जोरगेवार आपल्याला 200 युनिट वीज बिल माफ करण्यासाठी प्रयत्न करतील व आम्हाला न्याय मिळवून देतील पण आपल्या आश्वासनावर ठाम राहतील ते किशोर जोरगेवार कसले ? भाजप शिवसेना यांना बहुमत आले म्हणून आमदार झाल्या झाल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न मागता पाठिंबा जाहीर केला आणि राजकीय वातावरण फिरले आणि महाविकास आघाडीच सरकार आलं तेंव्हा त्या सरकारला सुद्धा न मागता पाठिंबा दिला पण ज्या जनतेने भरभरून पाठिंबा देऊन आमदार बनविले त्या जनतेला 200 युनिट वीज माफीच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यास ते तयार नाही त्यामुळे त्यांना आमदार म्हणून पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणूनच समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख व शहर अध्यक्ष तनशिल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयासमोर खंजिरी वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला व त्यांच्या कार्यालयासमोरील बैनेर फोटोच्या चेहऱ्यावर काळे फासन्यात येवून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलना नंतर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रती निर्माण झाला असून लॉक डाऊन च्या काळात वीज बिल कमी होण्यापेक्षा ते जवळपास 20 टक्क्यांनी वाढले असल्याने त्याबाबत जोरगेवार गप्प का ? हा मोठा प्रश्न असून आता जनतेचे उग्ररूप किशोर जोरगेवार यांना लवकरच बघावयास मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here