Home महाराष्ट्र महाराष्ट्र सैनिकांना अर्वाच्च भाषते शिवीगाळ करणाऱ्यां पो.नि.राजेंद्र कांबळे यांना तत्काळ निलंबित करा.

महाराष्ट्र सैनिकांना अर्वाच्च भाषते शिवीगाळ करणाऱ्यां पो.नि.राजेंद्र कांबळे यांना तत्काळ निलंबित करा.

 

मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी यांची गृहमंत्र्यांकडे मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवेच्या लोकार्पण कार्यक्रमात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्वाच्च भाषते शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यां पो.नि.राजेंद्र कांबळे यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील यांच्यासह चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्याबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त यांची भेट घेण्यासाठी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेले ६ महिने रितसर मार्गाने पत्र व्यवहार व संपर्क साधून वेळ मागत होते. परंतु आयुक्तांकडून वेळ देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने दि.५जानेवारी २०२१ रोजी महानगरपालिका परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी काही कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम स्थळी सनदशीर मार्गाने आयुक्त, वसई-विरार यांचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली,

महाराष्ट्रात दरदिवशी विविध विषयांवर ठिकठिकाणी अनेक संघटना, पक्षांकडून शेकडो आंदोलने होत असतात. अशी आंदोलने हाताळण्याची एक पद्धत आहे व नियम आहेत, परंतु वसई-विरारमध्ये घडलेला प्रकार कोणत्याही राजकिय पक्षाच्या, संघटनेच्या किंवा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत घडणे योग्य नाही. पो.नि.राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन महाराष्ट्र गृह खात्याला शोभा देणारे नसून अत्त्यंत घृणास्पद आहे. आंदोलकांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली, त्याची ध्वनिफित इलेक्ट्रॉनिक मिडीया व सोशल मिडीयावर सगळीकडे फिरत आहे.

वास्तविक आंदोलनकर्त्यांना कार्यक्रम होईपर्यंत स्थानबद्ध करण्याची आवश्यकता होती. परंतु पो.नि.राजेंद्र कांबळे यांनी तसे न करता सदर कार्यकर्त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केलेली आहे. त्याची आज सर्वसामान्यांमध्ये वाईट प्रतिक्रिया उमटत आहे. पो.नि.राजेंद्र कांबळे यांच्या अशा वर्तणुकीने महाराष्ट्र पोलिसीची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. त्यामूळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पो.नि.राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबीत करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरुन महाराष्ट्र पोलीस दल
आणि गृहखात्याबद्दल सकारात्मक संदेश जनतेमध्ये जाईल अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मनसे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी दिलीपभाऊ रामेडवार मनसे जिल्हाध्यक्ष, राहुल बालमवार मनवीसे जिल्हाध्यक्ष, मनदीप रोडे शहर अध्यक्ष, किशोर मडगुलवार जिल्हा सचिव,कुलदीप चंदनखेडे मनवीसे उपजिल्हा अध्यक्ष, विवेक धोटे मनवीसे तालुका अध्यक्ष, नितीन पेंदांम शहर अध्यक्ष मनवीसे, करण नायर तालुका सचिव,मयुर मदनकर, अक्षय भोयर, फिरोज शेख,चैतन्य सदाफळ इत्यादी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here