Home वरोरा पत्रकार दिन विशेष :- सामाजिक माध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमे विश्वसनीय ?

पत्रकार दिन विशेष :- सामाजिक माध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमे विश्वसनीय ?

एबीपी माझा च्या विदर्भ संपादक सरिता कौशिक यांचे पत्रकार दिनी प्रतिपादन.

वरोरा प्रतिनिधी :-

मराठी पत्रकारितेचे जनक तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य दिनांक ६ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आराध्य लॉन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमात मराठी न्यूज चैनेल च्या विदर्भ संपादक सरीता कौशिक ह्या प्रमुख वक्त्या म्हणून आपले विचार उपस्थित पत्रकार बंधू समोर ठेवले, त्या म्हणाल्या की आता पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे, आज प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया सोबतच सोशियल मिडिया सुद्धा स्ट्रॉंग आहेत अर्थात सोशियल मिडिया मधे जे काही प्रकाशित होत ते खरं असेल हे शक्य आहे असं नाही कारण त्यामधे जी गोष्ट नमूद असते त्याची शाश्वती असेलच असे नाही कधी कधी ती गोष्ट खोडसळ किंव्हा दुसऱ्या कडून मिळवली असते त्यामूळे सोशियल माध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया ह्या खऱ्या विश्वसनीय असतात अशा त्या म्हणाल्या.पत्रकारितेचे बदलते स्वरूप याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की बातम्या कव्हर करताना व्हिज्युअल खरंच वस्तुस्थितीला धरून आहे का ? याची शहानिशा करणे आवश्यक आहे, कारण कधी कधी जे व्हिज्युअल येतात ते चुकीचे सुद्धा असू शकतात या संदर्भात त्यांनी एक प्रशिद्ध न्यूज चैनेल वरील बातमीचा संदर्भ दिला.

पत्रकार मित्र परिवार वरोरा तर्फे आयोजित या कार्यक्रमात दैनिक पुण्य नगरी चे शेगाव प्रतिनिधी मनोज गाठले, माजरी प्रतिनिधी रवी भोगे, दैनिक सकाळ चे प्रतिनिधी बालकदास मोटघरे, अविनाश बंग, टेमुर्डा अशोक गाडगे यांचा त्यांच्या उत्कृष्ट बातम्या संदर्भात सत्कार करण्यात आला तर पोलीस दलात उत्क्रुष्ट कार्याबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या द्वारे वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे यांचा सन्मान झाला होता त्याबद्दल त्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
आजची बदललेली पत्रकारिता या संदर्भात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले, या प्रसंगी एबीपी माझाच्या सरीता कौशिक यांच्यासह जिल्हा समन्वयक सारंग पांडे, टीवी-9 महाराष्ट्र चे निलेश डहाट वरोरा नगरपरिषदचे अध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते. माजी नगराध्यक्ष विलास टिपले इत्यादींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत खुळे, प्रास्ताविक दैनिक पुण्य नगरी चे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील तर आभार प्रदर्शन चेतन लुथडे यांनी केले.या कार्यक्रमांला यशस्वी करण्यासाठी चेतन लुथडे, सूरज घूमे, सारथी ठाकूर, अनिल पाटील, मनीष भुसारी, सुनील शिरसाट हितेष राजनहिरे, वाळू जीवनें, विनोद चिकाटे, व इतर पत्रकारांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here