Home चंद्रपूर मनसे शहर संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात शहरात दोन मनसे शाखाचे उद्घाटन.

मनसे शहर संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात शहरात दोन मनसे शाखाचे उद्घाटन.

 

जिल्हाध्यक्ष रामेडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

चंद्रपूर :-

देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर शहर संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात शहरातील भिवापुर प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन शाखा चे उद्घाटन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी या प्रभागातील शेकडो विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात प्रवेश घेण्यात आला, महाराष्ट्रात युती नंतर महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले असून जनतेच्या वीज बीलाचा प्रश्न गंभीर बनला असताना आता तर चक्क थकीत वीज बिल भरले नाही तर वीज कनेक्शन कापन्यांचा आदेश व नोटीस काढल्याने वीज ग्राहक चिंतेत आहे आता या गंभीर प्रश्नाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर भूमिका घेत आल्याने येणाऱ्या काळात मनसेची सत्ता महाराष्ट्रात यावी यासाठी आम्ही मनसेत प्रवेश घेतल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

या शाखा उद्घाटन सोहळ्यात मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, सचिन भोयर, शहर संघटक मनोज तांबेकर, राजू बघेल महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड पियुष धुपे, सुनील गुडे, महेश शास्त्रकार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here