Home वरोरा खळबळजनक :- ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झालेला उमेदवार लगेच पायउतार?

खळबळजनक :- ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झालेला उमेदवार लगेच पायउतार?

 

खांबाडा(मनोहर खिरटकर)

उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत आता मोठ्या प्रमाणात गुलाल उधळणार असला तरी खांबाडा येथील यावर्षीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेला सदस्याला मागील निवडणुकीतील हिशोब सादर केला नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पायउतार व्हावे लागल्याची खळबळजनक घटना वरोरा तालुक्यातील खांबाडा ग्रामपंचायत मध्ये घडली आहे.
खांबाडा ग्रामपंचायत निवडणुकीतील संतोष उरकुडे यांनी मागील निवडणुकीत म्हणजे 7 ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या निवडणुकीत भाग घेतला होता,तो त्या निवडणुकीत पराभूत झाला होता, मात्र त्यांनी निवडणूक निकाल लागल्यापासून काही दिवसाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब तहसील कार्यालयात निवडणूक विभागाला सादर करणे कायदेशीर व अनिवार्य असताना उरकुडे यांनी मागील निवडणुकीत हिशोब सादर केला नाही. त्यामुळे 2017 मध्ये जिल्हाधिकारी यांनी पाच वर्षासाठी त्यांना अपात्र घोषित केले असतांना त्याला यावेळी निवडणुकीत उभे राहण्याचा घटनेनुसार अधिकार नव्हता पण तरीही त्यांनी नामांकन फॉर्म भरला आणि विशेष म्हणजे त्यांनी भरलेले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैद्य ठरवले नाही व त्याने पुन्हा यावर्षीची निवडणूक लढवली व तो निवडून सुद्धा आला. निवडून आल्यावर जिल्हाधिकाऱयांचा आदेश द्वारे दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल करून त्याला अपात्र घोषित करावे अशी मागणी केली व जिल्हाधिकारी यांनी सदर उमेदवाराला अपात्र केले असल्याचे समजते.
सदस्य म्हणून निवडून येऊन त्याला लगेच पायउतार व्हावे लागले असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले असून याबाबत ते न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आहे. पण अशाच प्रकारे अजून काही ग्रामपंचायत सदस्य जे निवडून आले पण त्यांनी आपली खरी माहिती लपवली असल्याने ते सुद्धा अपात्र ठरतील अशी शक्यता आहे, आता  सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here