Home चंद्रपूर घुग्घुस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फलकास काळे फासणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक, एक...

घुग्घुस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फलकास काळे फासणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक, एक फरार

 

भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरून घूग्गूस पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल.

घूग्गूस प्रतिनिधी :-

घूग्गूस शहरातील शुभम सर्वो पेट्रोल इण्डेण ऑइल कंपनीचे हद्दीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोविड जनजागृतीचे जाहिराती फलक लावून आहे,त्या फलकास युवक काँग्रेसच्या नेत्यांनी काळे फासण्याचा विकृतपणा केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून चंद्रपूर युवक काँग्रेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर व घुग्गुस युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख यांचेवर दिनांक 11/2/2021 रोजी रात्री घुग्गुस पोलिसानी कलम 500,427,447(34) गुन्हा दाखल करून 10:30 वाजता दरम्यान अटक केली. तर या प्रकरणातील आरोपी निखिल पुनगंटी हा फरार आहे.

दिनांक 11/2/2021 ला दुपारी 3 वाजता पेट्रोल डिझेल व गँस दरवाढीचा निषेध करण्यासाठी घुग्गुस काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान घुग्गुस वणी मार्गांवरील शुभम सर्वो पेट्रोल पंपवर मोर्चातील सहभागी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 4:50 वाजता तिथे जाऊन लावून असलेल्या पंतप्रधान यांच्या फलकास काळे फासले. हा घडलेला प्रकार भाजपा नेत्यांना व शेकडो कार्यकर्त्यांना माहिती होताच त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार घुग्गुस पोलीस स्टेशन येथे शेकडो कार्यकर्त्यानी मोठी गर्दी गेली व असे कृत्य करणाऱ्या युवक काँग्रेस नेत्यांच्या अटकेसाठी दोन तास ठिय्या आंदोलन केले.

यावेळी घुग्गुस भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले व शुभम सर्वो पेट्रोल पंपाचे संचालक हेमराज बोमले यांनी तक्रार दिली त्यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षण राहुल गांगुर्डे यांनी आरोपीं कडे पोलिसाना पाठवून घुग्गुस ठाण्यात आणले व गुन्हा दाखल करून अटक केली. त्यामुळे तणाव निवळला.

यावेळी निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जिप महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षक तांड्रा,माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे,साजन गोहणे, महेश लठ्ठा,सुचिता लुटे, पूजा दुर्गम,वैशाली ढवस, युवा मोर्चाचे अमोल थेरे,माजी तंमुस अध्यक्ष हसन शेख, मल्लेश बल्ला, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, भाजपा नेते हेमंत उरकुडे, निरंजन डंभारे,सुरेंद्र जोगी,शाम आगदारी, इम्तियाज मोहम्मद,बबलू सातपुते, अजय आमटे,शरद गेडाम, सुरेंद्र भोंगळे, धनराज पारखी,सुनील बाम,तुलसीदास ढवस,राजेन्द्र लुटे,नितीन काळे, शंकर सिद्दम,मंगेश पचारे,कोमल ठाकरे,हनीफ शेख, राजेश मोरपाका,राजू भोंगळे,मानस सिंग,सुशील डांगे,राजू डाकूर, रोहित मंडल,लड्डू चिलका,संकेत शेरकी, शुभम बोढे,राहुल बोबडे,बाळू शर्मा,श्रीकांत आगदारी, सुनील ब्रहमे उपस्थित होते.

Previous articleनगरपरिषद गडचांदूर कडून लाखो रुपयाच्या नालीचे निकृष्ट बांधकाम? नगरपरिषद प्रशासनाची डोळेझाक?
Next articleलक्षवेधी :- चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी तेंव्हाच उठणार? जेंव्हा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here