Home कोरपणा नगरपरिषद गडचांदूर कडून लाखो रुपयाच्या नालीचे निकृष्ट बांधकाम? नगरपरिषद प्रशासनाची डोळेझाक?

नगरपरिषद गडचांदूर कडून लाखो रुपयाच्या नालीचे निकृष्ट बांधकाम? नगरपरिषद प्रशासनाची डोळेझाक?

 

सामाजिक कार्यकर्ते दीपक वर्भे यांची नगरविकासमंत्री व प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार.

गडचांदूर प्रतिनिधी :-

नगरपरिषद गडचांदूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते फॉरेस्ट ऑफिस ते शौचालय पर्यंत सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम सध्या सुरु असून सदर कामाचे अंदाजपत्रकात त्रुटी असल्याने यापूर्वी हे काम काही दिवस बंद होते. आता काम पुन्हा सुरु झाल्यानंतर ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जचे काम केले असून आधी नालीची भिंत बनवितांना लोखंडी सलाख कमी वापरण्यात आली. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावर सिमेंट काँक्रेट मध्ये लोखंडी सलाख चक्क वरुन ठोकून टाकण्यात आली.(अश्या प्रकारे लोखंडी रॉड टाकण्याची बहुदा हि संपूर्ण देशात पहिलीच घटना असावी त्या बाबत चा विडिओ सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. आधी नाली हि ६ फूट खोल होती परंतु ठेकेदाराने आपले कॉंक्रिट व लोखंडी सलाख इत्यादी साहित्य वाचविण्या करिता सदर नाली हि फक्त २ फूट खोल केलेली आहे . हि नाली गावातील मुख्य नाली असून सुमारे ३५% लोकवस्तीचे पाणी वाहून नेत असते. पावसाळ्यात नालीच्या तोंडावर बरेच पाणी साचत असल्याने नगर परिषद ने मोठा नाला बनविण्याकरिता या नाली चे सिमेंट कॉंक्रिट मोठ्या नाल्यात रूपांतर करण्याकरिता रुपये ६२ लाख खर्च करण्याचे काम प्रस्तावित केले, परंतु सध्या ठेकेदाराने ६ फूट खोल नालीचे रूपांतर २ फूट नालीत केले आहे.त्या मुळे पुढे पावसाळ्यात शिवाजी चौकात मोठा तलाव निर्माण होण्याची पूर्ण शक्यता आहे. मागे असे बरेचदा झालेले हि आहे. त्या मुळे प्रभाग ६ येथील लोकवस्तीत पाणी घुसून लोकांच्या मालमतेची हानी होणार आहे व तसे झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी नगरपालिकेची राहील. पण एवढे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असतांना नगरपरिषद प्रशासन नेमक करत का आहे?हेच कळायला मार्ग नसून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक वर्भे यांनी जिल्हाधिकारी व नगरविकासमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

हे बांधकाम सुरु असतांना व्हायब्रेटर मशीन वापराने आवश्यक असतांना ती वापरण्यात आली नाही. सोबतच सिमेंट चे प्रमाण सुद्धा कमी आहे. TMT सलाख ही सुद्धा ५०० ची नसून ४५० TMT ची वापरण्यात येत आहे. सोलींग आणि बेड कॉंक्रिट सुद्धा अंदाजपत्रक प्रमाणे नाही. नालीच्या भिंती सुद्धा २००MM च्या नाहीत सोबतच रुंदी सुद्धा कमी आहे.

नाली चे काम ज्या पद्धतीने सुरु आहे त्यामुळे पुढे या नालीतून जुन्या नालीपेक्षाही कमी पाणी वाहुन जाणार आहे त्या मुळे जनतेला नाहक त्रास होणार आहे व जनतेचा पैसे वाया जाणार आहे. या कामावर नगर परिषद चे अभियंता यांचे बिलकूल लक्ष नसून जाणीवपूर्वक बांधकाम अभियंता निकृष्ट कामाला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे सदर कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता इतर नगर परिषद चे बांधकाम अभियंत्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे. चेंबर बनवितांना अंतर एकलग नसून कुठे जास्त तर कुठे अत्यंत कमी अंतर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नाली सफाई करण्याची सुद्धा पुढे अडचण निर्माण होणार आहे.

करिता नाली बांधकामाची मौका चौकशी करणे आवश्यक आहे, इतर नगर परिषद चे बांदकाम अभियंत्या कडून सदर कामाची चौकशी करावी अन्यथा मला या भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा सुद्धा दीपक वर्भे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Previous articleधक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांनी संपादक राजू कुकडे यांना जीवे मारण्याची पुन्हा दिली सुपारी.
Next articleघुग्घुस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फलकास काळे फासणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक, एक फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here