Home चंद्रपूर धक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांनी संपादक राजू कुकडे यांना जीवे मारण्याची...

धक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांनी संपादक राजू कुकडे यांना जीवे मारण्याची पुन्हा दिली सुपारी.

 

राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत धानोरकर यांच्या घरी चर्चा,हल्लेखोर गुंड घूग्गूस व बल्लारपूर येथील असण्याची शक्यता.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या गुंडांनी संपादक राजू कुकडे यांच्यावर वरोरा येथे दिनांक 18 जानेवारीला प्राणघातक हल्ला केला होता, त्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून खासदार बाळू धानोरकर यांच्यासह त्यांनी सुपारी देऊन पाठविलेल्या गुंडावर पत्रकार सरक्षण कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी राज्याचे ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक तहसीलदार यांच्यामार्फत केली होती, मात्र त्यानंतर सुद्धा संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते, या आंदोलनात डिजिटल मिडिया असोशिशन, विदर्भ ग्रामीण शहरी पत्रकार संघ तथा बहुभाषिक पत्रकार संपादक संघ या पत्रकार संघटना सुद्धा सामील झाल्या होत्या, लोकशाही पद्धतीने संपादक राजू कुकडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध सुरू असतांना आता चक्क खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरात शिवस्मारक मंडळाचे पदाधिकारी यांच्या समोर खासदार बाळू धानोरकर यांनी राजू कुकडे यांना मारण्याची सुपारी गुंडांना दिली असल्याची कबुली दिली असल्याने आता खासदार बाळू धानोरकर यांचा असली चेहरा जनतेसमोर आला आहे,

चंद्रपुरात शिवस्मारक जटपुरा गेट जवळ व्हावे या करिता छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे पदाधिकारी यांनी खासदार बाळू धानोरकर यांची दि.६/२/२०२१ रोज शनीवारला वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली असतां त्यावेळी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे यांच्या विषयी चर्चा झाली असता मंडळाच्या एका सदस्याने तुम्ही म्हणा राजू कुकडे यांना पकडून आणतो अशी फुशारकी मारली तर त्या अगोदर तुम्ही राजू कुकडे यांना मारण्याची सुपारी दिली पण गुंडांनी बरोबर काम केले नसल्याने म्हटले असता त्यावर खासदार बाळू धानोरकर यांनी हो असे म्हणत आता दुसऱ्याला सुपारी दिली असल्याची ग्वाही दिली, विशेष म्हणजे ही चर्चा आता पुरावा म्हणून संपादक राजू कुकडे यांच्या हाती लागली असून हे पुरावे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,पोलीस महानिरीक्षक नागपूर,पोलीस महा संचालक मुंबई यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस कमेटी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि नवनियुक्त काँगेस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार देवून सादर करण्यात येणार आहे.

खासदार धानोरकर यांच्या कडून गुंडांना पाठवून पत्रकारांवर हल्ला करण्याची निंदा चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात होत असून एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गुंड पाठवून कुण्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून विविध अवैध व्यवसायातून कोट्यावधी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता कमविणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांना भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल ची सकारात्मक बातमी नकारात्मक कशी वाटली? ही गोष्ट भल्याभल्यांच्या डोक्यात अजून आली नाही. एवढेच काय ज्येष्ठ पत्रकारांनी सुद्धा बाळू धानोरकर यांच्या बुद्धीचा एकदिवसीय आंदोलनात समाचार घेतला, खरं तर वरोरा येथील काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले यांनीच सकाळ पोर्टल ची फेसबुक वरील बातमी शेअर केली कारण त्याची लिंक त्यांनी फेसबुकवर टाकली होती व त्यात खासदार बाळू धानोरकर यांच्याविरोधात भयंकर तिखट प्रतिक्रिया आल्या होत्या आणि बातमी हजारो लोकांनी बघितली त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांची खरी बदनामी विलास टिपले यांनीच केली,

संपादक राजू कुकडे यांनी बदनामी केल्याचे समजून खासदार धानोरकर यांनी घूग्गूस व बल्लारपूर येथील गुंडांना सुपारी दिली असल्याची माहिती असून वरोरा पोलिसांना संपादक राजू कुकडे यांनी मोबाईल क्रमांक दिले असताना सुद्धा खासदार धानोरकर यांच्या दबावतंत्रामुळे ते गप्प असल्याचे चित्र आहे, पण पत्रकारांवर हल्ला करण्यासाठी खासदाराने गुंडे पाठवावे म्हणजे खासदार कमजोर आहे का ? की त्यांच्यात पत्रकारांना समज देण्याची किंव्हा चर्चा करण्याची हिंमत नाही का? हे प्रश्न उपस्थित होत आहे, कारण गुंडे ते पाठवतात जे कायर आहे व ज्यांच्यात स्वतः मुकाबला करण्याची हिमत नसते,आणि आता पत्रकारांच्या ह्या आंदोलनाची दखल सर्वत्र होऊन संपूर्ण लोकसभा क्षेत्रात ही वार्ता जाणार असल्याने “आ बैल मुझे मार” अशी गत खासदारांची होईल अशीच जास्त शक्यता आहे.

Previous articleधक्कादायक :- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून १० पेक्षा जास्त जन ठार, १५० पेक्षा अधिक लोक बेपत्ता.
Next articleनगरपरिषद गडचांदूर कडून लाखो रुपयाच्या नालीचे निकृष्ट बांधकाम? नगरपरिषद प्रशासनाची डोळेझाक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here