Home भद्रावती धक्कादायक :- – भद्रावती येथे नारळ पाणी विकणाऱ्या युवकाने गळफास घेऊन केली...

धक्कादायक :- – भद्रावती येथे नारळ पाणी विकणाऱ्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेताहेत.

भद्रावती प्रतिनिधी( उमेश कांबड़े)

शहरातील नागपूर -चंद्रपुर मुख्य महामार्गावर उदय लाज च्या बाजुला नारळ पाणी विकणाऱ्या एका युवकाने आपल्या गोदामात गडफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी दरम्यान ६ वाजता उघडकीस आली असून या आत्महत्येमागे कुठले कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहे.

याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे असून मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आनंद यादव वय २६ वर्ष , राहणार जोनपुर युपी असे असुन हा उदय लॉज समोरील भागात नारळ पाणी विक्री करण्याचे काम करीत होता, त्याच्याच बाजूला यांचे गोदाम असून त्या गोदामात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती ठानेदार सुनील सिंग पवार यांना होताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गजानन तेलरांधे यानी घटनेचा पंचनामा केला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय याचा तपास भद्रावती पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here