Home लक्षवेधी चिंताजनक :- बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड दोषी असल्यानेच गायब...

चिंताजनक :- बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड दोषी असल्यानेच गायब होते.

 

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी निष्पक्ष चौकशी होण्यासाठी CBI चौकशी आवश्यक.

न्यूज नेटवर्क :-

वनमंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार असून त्यांच्यावर सीबीआय चौकशी लावावी अशी विरोधकांची मागणी योग्य आहे. कारण जर संजय राठोड दोषी नव्हते तर ते प्रसारमाध्यमा एवढे दिवस समोर का आले नाही ? ज्या यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात पूजा अरुण राठोड ह्या महिलेचा गर्भपात झाला याचा पुरावा मिळाला व ऑडियो रेकॉर्डींग मधे सुद्धा संजय राठोड व अरुण राठोड यांच्या संभाषणात याबद्दल दोघांत चर्चा झाली की ती ऐकतच नाही ती आत्महत्या करते अशीच म्हणते याचा अर्थ पूजा चव्हाण व वनमंत्री संजय राठोड यांच्यात कुठेतरी सबंध होते आणि त्यांचा मध्यस्थ हा अरुण राठोड होता जो पूजा च्या सोबत रहायचा त्यामुळे हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश देऊन थंड करण्याचा घाट घातला असला तरी वनमंत्री संजय राठोड हे अनेक प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही हे स्पष्ट होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघड झाल्यापासून गायब झालेले संजय राठोड आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, संजय राठोड यांचे स्पष्टीकरण नसून त्यांनी आपल्या समाजाच्या आडून शक्ती प्रदर्शन केले व स्वतःला निर्दोष शीद्ध करण्याचा प्रयत्न केला शिवाय माझे मंत्रिपद गेले तर खबरदार माझ्यासोबत माझा समाज आहे हा संदेश त्यांनी आज स्वतच्या सरकारला व प्रसारमाध्यमातून जनतेला दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे जर ते निर्दोष होते तर एवढी दिवस भूमिगत का होते? हा मोठा प्रश्न असून त्या दरम्यान त्यांना स्वतःवर झालेल्या आरोपांचे पुरावे नष्ट करायचे होते का? आणि सोबतच काही साक्षदाराना पैसे देऊन मैनेज करायचे होते का? हे प्रश्न निर्माण होत आहे .

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणी आज पहिल्यांदाच भाष्य केलं. पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं म्हटलं. संजय राठोड हे ज्या पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा निरर्थक आहे जर संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी CBI चौकशीला सामोरे जावे,अशी विरोधकांची मागणी आहे.

Previous articleधक्कादायक :- – भद्रावती येथे नारळ पाणी विकणाऱ्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
Next articleब्रेकिंग न्यूज :-चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here