Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग.

ब्रेकिंग न्यूज :-चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग.

 

काम करणारे कामगार कर्मचारी सुरक्षित पण कोट्यावधीचे नुकसान.

चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

माजी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली येथे 8898.36 लक्ष किंमत असलेला बांबू प्रोजेक्ट आज आकस्मिक आग लागल्याने धाराशाही झाला, अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रोजेक्ट मधे शेकडो लोकांना रोजगार मिळणार होता पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्ट ला आग लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर झालेच पण यावर शेकडो लोकांचा रोजगार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बांबू प्रोजेक्ट ला आग लागली कशी? की यामागे काही छडयंत्र आहे हे चौकशीतून समोर येईलच पण या घटनेमुळे बांबू प्रोजेक्ट व्यवस्थापणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणाचीही जीवहानी झाली नाही.

Previous articleचिंताजनक :- बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड दोषी असल्यानेच गायब होते.
Next articleधक्कादायक :- सिंदेवाही तालुक्यातील लग्न आटपून निघालेल्या वरातीच्या गाडीला अपघात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here