Home चंद्रपूर धक्कादायक :- सिंदेवाही तालुक्यातील लग्न आटपून निघालेल्या वरातीच्या गाडीला अपघात.

धक्कादायक :- सिंदेवाही तालुक्यातील लग्न आटपून निघालेल्या वरातीच्या गाडीला अपघात.

 

चार वराती जागीच ठार तर 20 जन गंभीर जखमी.

सिंदेवाही न्यूज नेटवर्क :-

तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीच्या ट्रकला भीषण अपघात झाला असून या अपघातात चार वराती जागीच ठार झाले आहे तर 20 जन गंभीर जखमी झाले.

सिंदेवाही मेंडकी मार्गावरील कचेपार येथे हा भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक पलटी झाल्यानंतर चाके वरती झाले यामधे सर्वजण अडकले दरम्यान चार जणांचा जागीच अंत झाला त्यामधे रघु कोराम (४१) एकारा, साहिल विनोद केराम (१४), कविता संजय बोरकर (३५), लीना भास्कर गहाणे (२७) यांचा समावेश आहे.

अंजली घनशाम गहाणे ही लहानगी मुलगी या भीषण अपघातात वाचली. मात्र तिची आई लीना जागीच ठार झाली. या ट्रक मध्ये एकूण 50 वर्‍हाडी बसले होते, त्यात 20 गंभीर असल्याची माहिती आहे

Previous articleब्रेकिंग न्यूज :-चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग.
Next articleखळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांच्यावर शरीरसुखाची मागणीचा आरोप करणारी युवती ऐसिड हल्ल्याच्या भीतीने घरातून बाहेर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here