Home चंद्रपूर खळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांच्यावर शरीरसुखाची मागणीचा आरोप करणारी युवती ऐसिड...

खळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांच्यावर शरीरसुखाची मागणीचा आरोप करणारी युवती ऐसिड हल्ल्याच्या भीतीने घरातून बाहेर.

 

न्यायालयातून बांधकामास स्थगिती मिळाल्यानंतर सुद्धा युवतीच्या जागेवर बांधकाम सुरू.

चंद्रपूर न्यूज नेटवर्क:-

सत्ता असल्यावर त्याचा दुरुपयोग करून सर्वसामान्य जनतेला कसे वेठीस धरल्या जाते याचे ताजे उदाहरण समोर आले असून सरकार नगर येथील भाजप नगरसेवक संदीप आवारी यांनी त्याच वार्डातिल एका अविवाहित युवतीला मदत करण्याच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी करून तिचा हात पकडल्याचा खळबळजनक आरोप पीडित युवतीने केल्यानंतर सत्ताधारी कुठल्या स्थराल जात आहे याचा अंदाज येतो.

पीडित युवती ही सरकार नगर येथे तिची आई मरण पावल्यामुळे एकटी राहते तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिचे नावे असलेल्या जागेवर वंदना वानखेडे व गंगाधर वानखेडे यांनी जबरण बांधकाम करून त्या पीडित युवतीला मारहाण केली होती आता आपल्याला वाचविणार कोणी नाही म्हणून ती पीडित युवती त्याच प्रभागातील भाजप नगरसेवक संदीप आवारी यांच्या घरी गेली असता त्यावेळी त्यांनी तुझ सगळं बरोबर करून देतो मला शरीरसुख दे असे म्हणून तिचा हात पकडला दरम्यान ती युवती घाबरून जाऊन रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार देण्यास गेली पण पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले नाही त्यामुळे त्या पीडित युवतीने पत्रकार परिषद घेवून नगरसेवक संदीप आवारी यांच्यावर गुन्हे दाखल करा व त्यांचे पाठबळ असल्याने वंदना वानखेडे,गंगाधर वानखेडे हे जबरण माझ्या घरातील जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती, सोबतच न्यायालयात सदर बांधकाम रोखण्यासाठी तिने केस दाखल केली त्या केसेस चा निर्णय आला असून वंदना वानखेडे यांचे बांधकाम रोखण्याचा निर्णय न्यायालयाकडून  दिनांक 23 फेब्रुवारीला झाला परंतु नगरसेवक संदीप आवारी यांची महानगरपालिकेत असलेली सत्ता व पोलीस प्रशासन यांच्यासोबत असलेली अर्थपूर्ण सबंध  यामुळे बिचाऱ्या पीडित युवतीच्या जागेवर नगरसेवक संदीप आवारी यांच्या उपस्थितीत जबरण बांधकाम सुरू असून त्या युवतीवर अँसिड हल्ला करणार असल्याची तिला धमकी सदर लोकांकडून मिळाल्याने ती घरातून निघाली व दरदर भटकत आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन नेमकं करत का आहे? हेच कळायला मार्ग नसून तिच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यावर पोलीस जागणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जर न्यायालयातून बांधकाम स्थगिती आदेश आला असतांना पोलीस आणि नगरपालिका प्रशासन जोरजबरदस्तीने बांधकाम करणाऱ्या लोकांना मदत करीत असतील तर सर्वसामान्य जनतेचा वाली कोण? हा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here