Home चंद्रपूर प्रदूषणमुक्त रामाळा तलाव करण्याच्या इको प्रो च्या मागणीला मनसेचा पाठिंबा,

प्रदूषणमुक्त रामाळा तलाव करण्याच्या इको प्रो च्या मागणीला मनसेचा पाठिंबा,

 

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांची भेट घेवून इको प्रो च्या मागण्या त्वरित मंजूर करण्याची केली मागणी.

विशेष वार्ता :-

चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामाळा तलावा मधे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याने पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरून रोगराई ला निमंत्रण दिल्या जात आहे त्यामुळे ह्या तलावाचे खोलीकरणाच्या मागणीसह खोलिकरण करा अशी मागणी २२/०२/२०२१ पासून इको-प्रो संस्था चंद्रपूर यांच्या तर्फे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे, मात्र जिल्हा प्रशासन या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे शिस्टमंडळाने दिनांक २५/०२/२०२१ रोजी या आंदोलनाला भेट दिली व जाहीर पाठिंबा देऊन दि.२६/०२/२०२१ ला जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले व या आंदोलनातील सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करून कामाला सुरवात करावी अशी विनंती करण्यात आली, यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार,महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ. सुनिताताई गायकवाड, जिल्हासचिव किशोरभाऊ मडगूळवार,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, विधानसभा संघटक महेशभाऊ शास्त्रकार,महिला जिल्हासचिव अर्चना आमटे, शहर संघटक मनोज तांबेकर,सुयोग धनवलकर,कृष्णा गुप्ता,प्रविण शेवते,फिरोज शेख,वाणी सदालावार,वर्षा भोमले, शैलेश सदालावार यांची उपस्थिती होती.

Previous articleखळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांच्यावर शरीरसुखाची मागणीचा आरोप करणारी युवती ऐसिड हल्ल्याच्या भीतीने घरातून बाहेर.
Next articleक्राईम :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणी वडील व बहिणीने केली सीआयडी चौकशीची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here