Home चंद्रपूर क्राईम :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणी वडील व बहिणीने केली सीआयडी चौकशीची...

क्राईम :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणी वडील व बहिणीने केली सीआयडी चौकशीची मागणी.

 

सहा दिवसाच्या पोलीस कस्टडीत आरोपी गणेश कडून काय निघाले? घूग्गूस पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह?

घूग्गूस प्रतिनिधी :-

शुभम फुटाणे या अभियंता युवकांची हत्त्या करणारा हत्त्यारा गणेश पिंपळशेंडे हा तब्बल 28 दिवसानंतर सापडला खरा पण त्यांच्या सहा दिवसाच्या पोलीस कस्टडीत त्याच्याकडून इतर आरोपी चा शोध घेतला गेला नाही शिवाय शुभम ची हत्त्या नेमकी केली कशासाठी? याचा तपास पोलीस लाऊ शकली नाही उलट आता आरोपी गणेश हा न्यायालयीन कस्टडीत असल्याने पोलीस नेमका कुठला तपास करणार? असा सवाल उठत आहे,ज्या आई वडिलांनी शुभम ला इंजिनियर बनवले त्यांचा एकुलता एक वारसदार म्हणून पुढील पिढीचा दीपस्तंभ असा मुलगा तब्बल 28 दिवसानंतर म्रुत कुजलेल्या अवस्थेत बघितल्यावर त्या आईच्या काळजाला काय धक्का बसला असेल? याचे भान हरवीलेल्या पोलिसांनी खरं तर शुभम हत्त्याकांडात इतर आरोपीचा शोध घेणे गरजेचे असतांना त्यांनी ह्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न चाललेला असल्याची भावना शुभम फुटाणे यांच्या वडील व बहिणीने पत्रकार परिषदेत व्यक्त केली जी अत्यंत गंभीर असून अशा प्रकारे कुणाचा खून व्हावा ही कल्पनाच मनाला वेदना देणारी आहे पण पोलीस या प्रकरणी पुन्हा एकदा प्रामाणिकपणे तपास करून इतर आरोपींना अटक करणार का? असा सवाल शुभम च्या वडिलांनी केला आहे.

जेंव्हा आरोपी गणेश पिंपळशेंडे याला पोलिसांनी घटनास्थळी नेले त्यावेळी शुभम ची हत्त्या एका ठिकाणी,बॉडी 500 फुटावर दुसऱ्या रोडवर आणि मोबाईल तिसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती त्यानी पोलिसांना दाखवली त्यामुळे ही घटना एकटा व्यक्ती करूच शकणार नाही हे स्पष्ट होते त्यामुळे शुभम च्या हत्तेमागे पुन्हा दोन ते तीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही ? त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी व आरोपींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी म्रूतक शुभम चे वडील व बहिणीने पत्रकार परिषद घेवून केली

Previous articleक्राईम :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणी वडील व बहिणीने केली सीआयडी चौकशीची मागणी.
Next articleखळबळजनक :- श्रीराम सेनेचे तथाकथित जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here