Home चंद्रपूर खळबळजनक :- श्रीराम सेनेचे तथाकथित जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी...

खळबळजनक :- श्रीराम सेनेचे तथाकथित जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक.

 

सगळ्या अवैध धंद्यातील अवैध हप्ता वसुली भोवली?

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

वेकोली मध्ये नोकरी करणारे श्रीराम सेना ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना खंडणीच्या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी अटक केल्याची खळबळजनक घटना घडली असून मागील अनेक दिवसापासून अवैध रेती वाहतूकदाराकडून हप्ता वसुली चे सत्र त्यांनी जोरदार सुरू केले होते त्यामुळे अवैध रेती वाहतुकीदार व ट्रक्टर, ट्रक मालक चालक त्यांच्यावर फार संतापून होते.

श्रीराम सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आले आहेत.मात्र करणी आणि कथनी यामधे फरक असलेले अजय यादव हे स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष असल्याचे पण बोलल्या जायचे, कारण श्रीराम सेनेची कार्यकारणी अगोदरच बरखास्त झाली असल्याचे बोलल्या जात आहे,मात्र तरीही वेकोलीमध्ये नोकरीवर असलेले अजय यादव हे आपली ड्युटी न करता रेती तस्कर, कोळसा तस्कर, गौ-तस्कर यांना आपल्या पदाचा गैरवापर करत व्यवसाय करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.अशाच एका प्रकरणात त्यांना दूर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. 24 फेब्रुवारीला वसंता तोडासे सकाळी 7 वाजता आपल्या ट्रॅक्टरने विटा वाहतूक करीत असताना श्रीराम सेना आंतरराष्ट्रीय चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय यादव हे आपल्या स्कॉर्पिओ वाहन क्रमांक Mh34 am 9940 ने अचानक ट्रॅक्टर च्या समोर वाहन लावले व ट्रॅक्टर चालकाला जीवनिशी मारण्याची धमकी देत तुझ्या मालकाला 5 हजार मागितले असता त्याने टाळाटाळ केली असे म्हणत त्या चालकाला अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ट्रॅक्टर ची चावी व मोबाईल हिसकावला. त्यावरून तोडासे यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी भांदवी कलम 341, 385, 34 व 294 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अजय यादव यांना अटक केली. अजय यादव हे मागील काही महिन्यांपासून ट्रॅक्टर चालकांकडून अवैध हप्ता वसुली करायचे पैसे न दिल्यास त्यांना मारहाण करीत तू धंदा कसा करतोस ते बघतो म्हणत धमकी द्यायचे. अजय यादव हे वेकोली कर्मचारी असून ते कामावर न जाता वसुलीचे धंदे करायचे. आता स्वयंघोषित असलेल्या श्रीराम सेना पदाधिकारी यादव यांच्यावर वरिष्ठ पदाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here