Home भद्रावती धक्कादायक :- आयुध निर्माणी सहकारी पतसंस्थेत संचालक समितीचा लाखोंचा भ्रष्टाचार?

धक्कादायक :- आयुध निर्माणी सहकारी पतसंस्थेत संचालक समितीचा लाखोंचा भ्रष्टाचार?

 

सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्यासोबत साठगांठ करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

भ्रष्टाचारी संचालक समिती भाग-१

भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी सहकारी पतसंस्थेत संचालक समिती द्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भद्रावती यांच्याकडे काही पतसंस्थेच्या भागधारकांनी दिल्या शिवाय जिल्हा उपनिबंधक यांच्यासह विभागीय निबंधक नागपूर यांच्याकडे तक्रारी दिल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी उपलेखापरिक्षक रवी मांढळकर यांच्याकडे सोपवली असता त्यांनी कर्मचारी भत्ता, हेल्मेट खरेदी,फर्निचर बांधकाम,बिल्डिंग मेन्टेनन्स,डाटा सेंटर इत्यादी प्रकरणात संचालक समितीचे
एस.व्ही. टेंगळे-अध्यक्ष,व्ही. डी. कांबळे – मानद सचिव
एस. बी. निरंजणे- उपाध्यक्ष, संचालक-एम. पी. तुराणकर अभिमन्यु कुमार,जी. डी. करकाडे, एस. टी. हजारे
आर. के. आलोक, ए. ए. खान, संचालिका-श्रीमती लिपीका के. डांगे श्रीमती स्वाती एस. उपरे यांच्यावर जवळपास 57.92 लाखांच्या उधळपट्टी चा ठपका ठेऊन तीन प्रकरणात फौजदारी कारवाई व एका प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्याचा अहवाल सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्याकडे सोपविला पण या प्रकरणात समितीच्या संचालकांकडून लाखो रुपये घेऊन सहाय्यक निबंधक यांनी ह्या प्रकरणात संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याने आता हे प्रकरण अतिशय गंभीर बनले असून एकूण 2700 सभासद असलेल्या पतसंस्थेत लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या संचालकांवर स्थानिक पोलीस स्टेशन येथे तक्रार करून गुन्हे दाखल करण्यास सहाय्यक निबंधक हे कधी पुढे येणार? हा प्रश्न आता एकूण 2700 सभासद विचारू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here