Home भद्रावती धक्कादायक ;- भद्रावती येथील राउफ पठान यांच्यावर दारू माफिया अक्षय मन्ने यांचा...

धक्कादायक ;- भद्रावती येथील राउफ पठान यांच्यावर दारू माफिया अक्षय मन्ने यांचा प्राणघातक हल्ला.

 

भीमआर्मीचे जिल्हाध्यक्ष शंकर मून यांनी केली कारवाईची मागणी.

भद्रावती प्रतिनिधी उमेश कांबळे :-

जिल्ह्यात अवैध दारूविक्रीतून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या आमदनीमुळे दारू माफियांची दादागिरी वाढली असून आता सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ले करण्याचे धाडस ते करीत असल्याने ह्या अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळने आवश्यक आहे, मात्र पोलीस प्रशासनाच्या हप्तेखोरीमुळे ह्या दारू माफियांच्या दादागिरीला वाव मिळत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात अवैध दारू विक्रेत्यांकडून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचे चित्र दिसत आहे .

रउफ खाँ सत्तार खाँ पठाण वय 60 वर्ष, रा.अंबेडकर कालनी, आणि त्याचे मित्र भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष शंकर मून, हे अवैध दारू विक्रेते अक्षय मन्ने यांनी बोलवल्याने भेटावयास गेले असता शंकर मून यांना घराबाहेर ढकलून रउफ खाँ पठाण यांना घरात कोंडले व अक्षय मन्ने यांनी आपल्या साथीदारांना घेऊन धारदार शस्त्राने हल्ला केला व
बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रउफखाँ पठाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र गंभीर स्थिती बघता पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात रेफरं करण्यात आले, दरम्यान भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष शंकर मून यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना सांय 4.30 वा नागमंदिर , कुटेमाटे दवाखान्या जवळ घडली असून आरोपी दारू माफिया अक्षय मन्ने आणि त्याचे साथिदार फरार झाले आहे या घटनेचा तपास थानेदार सुनील सिंह पवार करीत आहे.

Previous articleधक्कादायक :- आयुध निर्माणी सहकारी पतसंस्थेत संचालक समितीचा लाखोंचा भ्रष्टाचार?
Next articleखळबळजनक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी उडवले 57.92 लाख?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here