Home भद्रावती खळबळजनक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी उडवले 57.92 लाख?

खळबळजनक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी उडवले 57.92 लाख?

 

पोथारे या सहाय्यक निबंधकानी प्रकरण दडपण्यासाठी घेतली लाच?

भ्रष्टाचारी संचालक समिती भाग-२

सहकार क्षेत्रात जनतेच्या पैशाची कशी लूट संचालक मंडळाकडून होते याचे ताजे उदाहरण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेत झालेल्या भ्रष्टाचाराने एकदा शीद्ध झाले असतानाच आता तर पतसंस्थेत सुद्धा सभासदांच्या पैशावर संचालक संमितीकडून कसा डल्ला मारल्या जातो याचे उदाहरण चांदा आयुध निर्माणी सहकारी पत संस्था संचालक समितीने दाखवून दिले आहे.

आयुध निर्माणी सहकारी पत संस्था भद्रावती संचालक समितीने कर्मचारी भरती, हेल्मेट खरेदी, फर्निचर बांधकाम, बिल्डिंग मेन्टेनन्स,डाटा सेंटर मधील संघनक खरेदी इत्यादीमधे लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पतसंस्थेच्या सभासदांनी सहाय्यक तालुका निबंधक, जिल्हा उपनिबंधक व विभागीय निबंधक यांच्याकडे दिली त्यामुळे या पतसंस्थेची चौकशी लागून उपलेखापरीक्षक सहकारी संस्था रवी माढळकर यांच्याकडे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले दरम्यान अतिशय काटेकोरपणे पतसंस्थेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करून संचालक समितीने तब्बल 57.92 हजार रुपयाची आगाऊ ची रक्कम हडप केल्याची बाब अहवालात नमूद करण्यात आली व या भ्रष्टाचारामुळे संचालक समितीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली.

सहाय्यक निबंधक पोथारे यांनी आयुध निर्माणी सहकारी पत संस्था संचालकांविरोधात भद्रावती पोलीस स्टेशन मधे तक्रार करून त्यांच्यावर पतसंस्थेच्या पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करायला हवे होते, मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी सहाय्यक निबंधक पोथारे यांनी मोठी रक्कम घेवून संचालक समितीला वरिष्ठांकडे अपील करण्यास सूट दिली त्यामुळे पुन्हा एकदा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळविण्यात व आपल्यावरची कारवाई स्थगिती करण्यास भ्रष्टाचारी संचालक समिती यशस्वी झाली, पण आयुध निर्माणी सहकारी पत संस्था संचालक समितीने केलेला भ्रष्टाचार हा 2700 सभासदांच्या पैशातून झाल्याने जोपर्यंत या सभासदांच्या पैशाची भरपाई होत नाही व संचालक समितीवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल ही भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरूच राहणार आहे.

Previous articleधक्कादायक ;- भद्रावती येथील राउफ पठान यांच्यावर दारू माफिया अक्षय मन्ने यांचा प्राणघातक हल्ला.
Next articleब्रेकिंग ;- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here