Home Breaking News ब्रेकिंग ;- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?

ब्रेकिंग ;- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची भेट नाकारली.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत आलेले आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या बातम्या सामाजिक माध्यमांमधे सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी सहपत्नी भेट घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या संजय राठोड यांची भेट मुख्यमंत्री यांनी नाकारल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा व आमदारकीचा सुद्धा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते असे एकूण राजकीय चित्र दिसत आहे,

भारतीय जनता पक्षानं राठोड यांच्या राजीनाम्यासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. तर राठोड यांनी राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी पक्षावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका असा मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव आहे मात्र राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याने मुख्यमंत्री सुद्धा संजय राठोड यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here