Home चंद्रपूर खळबळजनक ;- घूग्गूस येथील लॉयड मेटल्स कंपनीत कामगारांचे ठिय्या आंदोलन?

खळबळजनक ;- घूग्गूस येथील लॉयड मेटल्स कंपनीत कामगारांचे ठिय्या आंदोलन?

 

लॉयड मेटल्सच्या पाणी चोरी प्रकरणात कंपनीला कोट्यावधी दंड आणि आता कामगार बसले ठिय्यावर?

घूग्गूस प्रतिनिधी :-

घूग्गूस येथील लॉयड मेटल्स कंपनी ही नेहमीच वादात असते पण आता खुद्द कंपनीच्या पाणी चोरीचा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्याने व या प्रकरणात कंपनी व्यवस्थापनावर पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल होणार असल्याने अगोदरच कंपनी व्यवस्थापन संकटात असतांना आता कंपनीच्या कामगारांनी कंपनी च्या आत ठिय्या आंदोलन केला असल्याची कामगारांच्या माध्यमातून  समोर आल्याने कंपनी व्यवस्थापकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

58 वर्षावरील कामगारांना काढून टाकणे, ठरलेली पगार वाढ न करणे व केवळ २०ते २१दिवसच महिन्यातून ड्यूट्या देणे इत्यादी मागण्यांसाठी कामगारांनी ठिय्या आंदोलन आज सकाळ पासून कंपनीच्या आतमधे सुरू केल्याने व ही बातमी लिक होऊ नये म्हणून कडक बंदोबस्त कंपनी व्यवस्थापन करीत असल्याने आता कंपनी व्यवस्थापनाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous articleब्रेकिंग ;- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?
Next articleधक्कादायक :- देशातील सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here