Home महाराष्ट्र आनंदाची बातमी :- महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही आणि तोडले...

आनंदाची बातमी :- महाराष्ट्रातील वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही आणि तोडले ते जोडले जाईल,

 

विधानसभा सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?

न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रातील जमतेला लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्यात यावे व वाढीव वीज बिल मागे घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ऊर्जामंत्री,ऊर्जा सचिव, राज्यपाल आणि नंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वीज ग्राहकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी केली होती परंतु राज्य सरकारने याची दखल न घेता उलट सक्तीची बिल वसुली करण्याचा अध्यादेश काढला होता त्यामुळे सरकारच्या या धोरणाचा विरोध करून जनतेला सरकारने वीज बीलात सूट देण्याचे मान्य केल्यानंतर व लवकरच वीज ग्राहकांना गोड बातमी देण्याची घोषणा दिल्यानंतर  घूमजाव केले त्यामुळे एक प्रकारची वीज ग्राहकांची ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा सचिव यांनी दिशाभूल केली त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी यांच्या मार्फत ऊर्जामंत्री ऊर्जा सचिव यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मधे फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली होती.

मात्र  निगरगट्ट सरकार ने वीज ग्राहकांना कुठलीही वीज बीलात सूट न देता वीज कनेक्शन कापणे सुरू केल्याने जवळपास लाखोंच्या संख्येने वीज ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वीज ग्राहकांचा हा प्रश्न लावून धरला त्यामुळे सरकारतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सत्ताधारी आणि विरोधी गटात चर्चा होत नाही तोपर्यंत कुठल्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन कापनार अशी विधानसभेत घोषणा केल्यानंतर आता वीज ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येणार नाही व ज्यांचे वीज कनेक्शन तोडले गेले असेल त्यांचे जोडले जाईल अशी शक्यता आहे.

 

Previous articleमनसे इशारा :- सिद्धपल्ली व्यवस्थापन व कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- मनसेची मागणी
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर शहरात पुन्हा 26 वर्षीय युवकाचा खून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here