Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर शहरात चालतोय ब्राऊन शुगरचा धंदा. युवा व विद्यार्थी व्यसनाच्या...

धक्कादायक :- चंद्रपूर शहरात चालतोय ब्राऊन शुगरचा धंदा. युवा व विद्यार्थी व्यसनाच्या जाळ्यात

 

२२ ग्राम ४१० मिलीग्राम ब्राउन शुगरसोबत एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक.

चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी दारूचा महापूर येथे वाहत आहे परंतु आता तर चक्क ब्राऊन सूगरची दिवसाढवळ्या विक्री होत असल्याने जिल्ह्यातील भावी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचे चिन्ह दिसत आहे. मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात गद्दा व ब्राउन शुगर येत असल्याबाबतच्या तकारी पोलीस अधिक्षक अरविद साळवे यांना प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे पोलीस अधिक्षक साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एक एन.डी पी.एस पथक तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे यांचे नेतृत्वात एक एन.डी.पी.एस. पथक तयार करण्यात आले आहे.

त्या पथकाने दि. ०८/०३/२०२१ रोजी पो उप नि. संदिप कापडे, स.फो. राजेन्द्र खनके वतं. १३१७, पो वा. महेंद्र भुजाळे /१०२४. ना. पो. का. जमीरखान पठान/२४९ अनुप डांगे/६८०, मिलींद चौव्हाण ८९६. पो.शि. संदिप मुळे/२५७१, अमोल पंदरे/५७३ । जावेद सिददीकी /२५३२. सह शासकीय वाहन के. एम एच ३४ – ८५८३ ने रेकॉर्ड वरील गुन्हेगार व एन.डी.पी.एस.बाबत पो.स्टे, रामनगर परीसरात पेट्रोलींग सुरू केले असता एका खास गुप्त बातमीदाराने विश्वसनिय खबर दिली कि, लालपेट कॉलरी न. ३ श्रीनगर वार्ड यंद्रपुर येथे राहणारा अजय सिताराम धुनीरवीदास नावाचा ईसम ज्याचा रंग काळा, बाधा मजबुत, उंची अंदाजे पाच पुट सहा ईच अंगात पांढन्या सिमेंट रंगाची टि-शर्ट फिक्कट निळा रंगाचा जिन्स पॅन्ट घातलेला पाठीवर निळया रंगाची कॉलेज बँग असलेला एक इसम त्याचे ताब्यात अवैधरित्या अमली पदार्थ गर्द/ब्राउन शुगर विकीकरीता घेवुन चंद्रपुर ते नागपुर रोड वरोरा नाका उडानपुलीया खाली गिन्हाईकास विकी करण्याकरीता येणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने. सदर माहीती पोनी श्री. बाळासाहेब खाडे यांना देण्यात आली.त्यांनी सदर माहीती पोलीस अधिक्षक साळवे यांना दिली व पोलीस अधिक्षक साळवे यांनी तात्काळ कार्यवाही करण्या बाबत सुचना दिल्या. मिळालेल्या माहीती प्रमाणे वरोरा नाका परीसरात पोलीसांनी सापळा रचुन पंचासमक्ष सदर इसमाची अंगझडती घेतली असता सदर इसमाचे पाठीवर निळ्या रंगाची कापडी कॉलेज बॅग दिसुन आली सदर कालेज बॅगची चैन उघडुन पाहीले असता त्यामध्ये एका प्लास्टीकचे पॉकिटमध्ये तपकीरी रंगाची पावडर असल्यावे दिसले.

सदर पावडर कशाची आहे याबाबत त्यास विचारणा केली असता गर्द पावडर (ब्राउन शुगर )असल्याचे सांगीतले त्याबाबतची माहीती मिळाली व त्याचे कडून एकूण २२ ग्राम ४१० मिलीग्राम ब्राउन शुगर मिळाल्याने त्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले. आता शहरात पुन्हा अशा प्रकारे किती ब्राऊन शुगर विकणारे आहेत याचा शोध पोलीस घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here