Home महाराष्ट्र मनसेच्या १५ व्या वर्धापनदिनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे अनोखे बोल “जिना...

मनसेच्या १५ व्या वर्धापनदिनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे अनोखे बोल “जिना यहा मरना यहा , मनसे के सिवा जाना कहा”

 

पक्षाच्या १५ व्या वर्धापनदिनी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांना घातलेली साद ही नक्कीच महाराष्ट्रात मनसेच्या विजयाची नांदी ठरावी.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही युवा कार्यकर्त्यांची राजकीय संघटना असून इथे १५ वर्षात कार्यकर्त्यांतून कित्तेक नेते निर्माण झाले, पण नेते पद अंगात शिरल्याने व विरोधी पक्षात संधी मिळते म्हणून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ता पक्षात जाणाऱ्यांची काही कमी नाही, त्यात वसंत गीते, राम कदम, प्रवीण दरेकर इत्यादींचा प्रमुख उल्लेख होतो, एकीकडे पक्षात प्रतिष्ठा मान सन्मान व स्वतःची ओळख निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठांवर दूषणे लावली, पण जेव्हां सत्ता नसतांना व बाळासाहेबांसारखा ढान्या वाघ यांच्या छत्रछायेत अनेक पदे मिळाली असतांना राजसाहेब शिवसेना सोडून एकटे आहे म्हणून त्यांच्यासोबत जाण्याची बाळा नांदगावकर  यांनी बाळासाहेबांना हात जोडून परवानगी मागितली,व म्हणाले साहेब राजसाहेब एकटे आहेत त्यांना एकटे सोडून कसे चालणार? मला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी द्या आणि त्यावर बाळासाहेबांनी होकार दिला, आज तेव्हापासून बाळा नांदगावकर हे कुठलीही अपेक्षा न करता पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या चुटपुट आरोपांना तोंड देत राजसाहेबांसोबत अगदी सावलीसारखे ठाम सोबत आहे, नव्हे त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून नव्या कार्यकर्त्यांसमोर एकनिष्ठतेचा एक आदर्श निर्माण केला आहे.

आज पक्षाचा १५ वा वर्धापन दिवस आहे याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया दिली त्यात ते म्हणाले की “बघता बघता 16 व्या वर्षात पक्ष पदार्पण करत आहे. पक्ष स्थापनेपासून आज पर्यंत आपण सर्वांनी अनेक चढ उतार पाहिले पण कोणत्याही परिस्थितीत आपण आपली राजसाहेबांवरील श्रद्धा ढळू दिली नाही. परिवार असो की पक्ष जेथे मुखिया भक्कम असतो तिथे वाटचाल खडतर जरी असली तरी निश्चित असते. या 15 वर्षांत अनेक लोक आले व काही सोडून हि गेले पण राजसाहेब व महाराष्ट्र सैनिक यांचे नाते घट्ट होत गेले. स्वतःचा पक्ष स्थापन करणे व 15 वर्षे पूर्ण करणे हा खुप मोठा टप्पा असतो. आज आपण 16 व्या वर्षात पदार्पण करीत असतांना एवढेच सांगेन कि
“16 वे वर्ष मोक्याचे”.
इथून पुढील चित्र हे नक्कीच आश्वासक असेल.
या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एक भावना नक्कीच आहे,
“जिना यहा मरना यहा , मनसे के सिवा जाना कहा.”

खरं तर मनसे नेते बाळा नांदगावकर हे राजसाहेब ठाकरे यांचे खरे विश्वासू मित्र, बंधू आणि लढवय्ये सैनिक आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठलेही संकट असो प्रथम फोन जातो तो बाळा नांदगावकर यांचाच आणि राजसाहेबांपर्यंत कार्यकर्त्याचा आवाज पोहचविण्याचे कार्य सुद्धा अगदी तळमळीने ते करतात त्यामुळे ते पक्षाचे एक आधारवड झाले आहेत त्यामुळे पक्षाच्या १५ व्या वर्धापनदिनी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांना घातलेली साद ही नक्कीच महाराष्ट्रात मनसेच्या विजयाची नांदी ठरावी हीच भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल संपादकीय मंडळाची सदिच्छा आणि शुभेच्छा …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here