Home भद्रावती खळबळजनक :- प्रवीण नागोशे यांचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळल्याने घातपाताचा संशय बळावला?

खळबळजनक :- प्रवीण नागोशे यांचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळल्याने घातपाताचा संशय बळावला?

घातपाता मागचे नेमके कारण काय हे पोलीस चौकशीतून येणार समोर.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

आजच्या स्थितीत हत्त्या करणे हे सामान्य बाब झाली असून शुल्लक कारणावरून अनेकांच्या हत्त्या झाल्याची अनेक उदहरणे आहे त्यातच कौटुंबिक कलह व स्त्रीचे परपुरुषाची विवाहबद्ध असलेले सबंध हे सुद्धा हत्त्यचे मोठे कारण ठरत आहे अशाच प्रकारची खळबळजनक घटना भद्रावती येथून जवळच असलेल्या पिर्ली शेतशिवारात घडली असून प्रवीण नागौसे ह्या युवकाचे सडलेले प्रेत आढळून आल्याने  घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. 
 
        पीर्ली येथील शेतशीवारात दि.७ मार्च रोजी रात्री ९ वाजताचे दरम्यान एका अज्ञात इसमाचे प्रेत येथील वामन देठे यांच्या शेताजवळ नाल्यात आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस पाटलांना दिली. त्यानंतर भद्रावती पोलिसांना कळविण्यात आले. गावकऱ्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता डाव्या हातावरील अपघाताच्या खुणेवरुन आणि त्याच्या पायातील स्लिपर चप्पलवरुन तो आपल्याच गावातील प्रवीण शामराव नागोशे (३२) असल्याची खात्री गावकऱ्यांना पटली.सदर प्रेत हे पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर 
पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करुन नातेवाईकांना सुपूर्द केले. सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण हा स्वभावाने साधा सरळ होता. गावातच मोलमजुरी करायचा. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये  असून त्याची पत्नी खोकरी येथे माहेरी गेली होती. प्रवीणचा मृत्यू घातपाताचा प्रकार असू शकतो. त्याची हत्त्या करून त्याचे प्रेत नाल्यात टाकले असावे अशी शंका बळावली असल्याने या गंभीर प्रकरणाची  पोलिसांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here