Home धक्कादायक धक्कादायक :- मानलेल्या भावासोबत दोन मुलांना घरी ठेऊन पळाली विवाहित महिला.

धक्कादायक :- मानलेल्या भावासोबत दोन मुलांना घरी ठेऊन पळाली विवाहित महिला.

 

चार वर्षाची मुलगी म्हणते “माझी आई मामा सोबत पळाली आणि ती मेली.”

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

या कलियुगात रिश्ते नाते आता बदलायला लागले असून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला सुद्धा कलंकित केल्या जात असल्याच्या भयंकर घटना घडायला लागल्या आहे. यातच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे हा प्रकार घडला असून पूजा नामक एका विवाहित महिलेचा पंकज याच्याशी १० वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता व त्यांना एक ९ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाची मुलगी आहे पण दीपक सुभाष शर्मा नामक एका व्यक्तीने अनेक वर्षापासून ज्या पूजा कडून राखी बांधून घेतली व जणू दोघे भाऊ बहीण असल्याप्रमाणे दोन्ही कुटुंबाला वाटायचे त्या दीपक शर्मा वय ४५ वर्ष यांनी आपल्या मानलेल्या बहीण पुजाला घेऊन पळाल्याची घटना घडली आणि यामुळे एक भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करण्यात आले. विशेष म्हणजे आपल्या दोन मुलांना घरी ठेऊन पळालेल्या पुजानी आपण दीपक शर्मा सोबत लग्न केल्याचे राळेगाव  पोलीस स्टेशन मधे लेखी पत्राद्वारे व तोंडी सांगितले असल्याने ती महिला किती निर्दयी असेल हे स्पष्ट दिसत आहे.

या संदर्भात पूजा पासून दूर गेलेल्या दोन मुलांना विचारले की तुझी आई कुठे आहे? त्यावर ९ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाची मुलगी म्हणते की माझी आई दीपक मामा सोबत पळून गेली आणि ती मेली आहे. हे ऐकून कुण्याही स्त्री चे काळीज फाटेल पण त्या पूजाच एवढ कठोर मन का झालं आहे? हे कळायला मार्ग नसून ती दोन निरागस मुले आता आपल्या वडिलांसोबत आजी कडे आहे त्यांना कसं वाटतं असेल? आईच मुलांची वैरीन होते हे कदाचित इतिहासातील फार कमी उदाहरण असेल पण प्रश्न गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here