Home भद्रावती चिंताजनक :- सहाय्यक तालुका निबंधक पोथारेची आयुध निर्माणी कर्मचारी पतसंस्थेच्या भ्रष्ट संचालकांना...

चिंताजनक :- सहाय्यक तालुका निबंधक पोथारेची आयुध निर्माणी कर्मचारी पतसंस्थेच्या भ्रष्ट संचालकांना वाचविण्याची सर्कस?

 

पोथारे यांची विभागीय चौकशी झाल्यास अनेक संस्थेच्या घोटाळेबाजांना वाचवून कोट्यावधीची माया जमविल्याचे होणार सिद्ध.

भ्रष्ट संचालक समिती भाग – ६

भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी सहकारी पतसंस्थेत संचालक समिती द्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या तक्रारी सहाय्यक तालुका निबंधक सहकारी संस्था भद्रावती यांच्याकडे काही पतसंस्थेच्या भागधारकांनी दिल्या शिवाय जिल्हा उपनिबंधक यांच्यासह विभागीय निबंधक नागपूर यांच्याकडे तक्रारी दिल्यानंतर या भ्रष्टाचाराची चौकशी उपलेखापरिक्षक रवी मांढळकर यांच्याकडे सोपवली असता त्यांनी कर्मचारी भरती हेल्मेट खरेदी, फर्निचर बांधकाम, बिल्डिंग मेन्टेनन्स,डाटा सेंटर इत्यादी प्रकरणात संचालक समितीचे संचालक यांनी जवळपास 57.92 लाखांची अफरातफर व उधळपट्टी केल्याचा ठपका ठेऊन तीन प्रकरणात फौजदारी कारवाई व एका प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्याचा अहवाल सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्याकडे सोपविला पण अगोदरच भ्रष्टाचाराचा कळस गाठलेले तालुका सहाय्यक निबंधक पोथारे यांनी भ्रष्ट संचालकांविरोधात पोलीस स्टेशन मधे तक्रार देऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले नाही त्यामुळे भ्रष्ट संचालक मंडळाला वेळ मिळाला आणि त्यांनी विभागीय सह निबंधक यांच्याकडे या अहवालाच्या विरोधात अपील केली आणि पुन्हा एकदा या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश निघून सौ श्रीकोंडवार यांना चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

खरं तर उपलेखापरिक्षक रवी मांढळकर यांनी प्रामाणिकपणे चौकशी करून अहवाल दिला होता ज्यात संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून अफरातफर झालेली रक्कम भरपाई म्हणून वसूल करण्यात यायला हवी होती पण सौ श्रीकोंडवार यांना चौकशी करण्याचे पुन्हा आदेश देऊन भ्रष्ट संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न होणार हे अगोदरच दिसत असतांना अगदी त्याच स्वरूपाचा अहवाल दिनांक 28/07/2020 ला सादर करण्यात आला व तब्बल 177 पानांचे अहवालतील 6 मुद्द्यांना चौकशीतून बगल देऊन फक्त 18 पेजचा अहवाल दिला गेला व सौ.श्रीकोंडवर यांनी दिलेल्या अहवालानुसार 1) 49 हेल्मेट गायब/चोरी गेल्यामुळे 49 हेल्मेट ची रक्कम 43365 रु. याची जबाबजारी निश्चित करून संस्थेच्या कर्मचारी यांचे कडून वसुल करण्यास सांगितले.2)संस्थेच्या व्यवस्थापक यांनी दिलेल्या पत्रानुसार कामे अपूर्ण आहेत ती कामे पूर्ण करण्यास सांगितले तसेच कामे अपूर्ण असल्यामुळे 20%रक्कम 4,93,244 रुपये रक्कम चांदा प्लायवूड यांचेकडून व्याजासह वसूल करण्यास सांगितले. यानुसार दि.1.11.2020 ला सहाय्यक निबंधक भद्रावती यांनी संचालक मंडळ यांना दोन्ही रक्कम 1 महिन्यात भरण्यास सांगितले. परंतु संचालक मंडळाने या दोन्ही रक्कम भरल्या नाहीत . यामुळे सहाय्यक निबंधक भद्रावती यांनी दुसरे रिमाईंडर दि.3.12.2020 ला संचालक मंडळ यांना 7 दिवसांत दोन्ही रक्कम भरण्यासाठी सांगितले. नाहीतर संचालक मंडळा वर कार्यवाही करण्यात येणार असे निर्देश दिले. त्यानुसार 49 हेल्मेट ची रक्कम 43365 भरण्यात आली परंतु चांदा प्लायवूड यांचे कडून 4,93,244 एवढी रक्कम व्याजासह वसूल करण्यात आली नाही.

आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेचा दोषदुरुस्ती अहवाल सौ.श्रीकोंडवर व सहाय्यक निबंधक भद्रावती यांना संस्थेकडून पाठविण्यात आला. व तो सौ.श्रीकोंडवर यांनी दि.1.02.2021 ला दोषदुरुस्ती अहवाल सहाय्यक निबंधक भद्रावती येथे सादर केला. या अहवालात शेरे/आक्षेप दिले त्यानुसार संचालक मंडळावर तक्रारीतील मुद्द्यावर आक्षेप कायम ठेवले तरी पण सहाय्यक निबंधक भद्रावती भ्रष्टाचारी संचालक मंडळावर कार्यवाही करण्यासाठी टाळ टाळ करीत आहेत. त्यामुळे तालुका सहाय्यक निबंधक पोथारे हेच खरे भ्रष्टाचारी असून यांच्यावर खऱ्या अर्थाने विभागीय चौकशी झाल्यास त्यांनी आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेसह कित्तेक संस्थेच्या घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी कोट्यावधी रुपयाची माया घेतल्याचे सिद्ध होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here