Home भद्रावती पोलीस डायरी :- माजरी पोलिसांनी पकडला गांजा आरोपी शंकर वर्मा कडून मुद्देमाल...

पोलीस डायरी :- माजरी पोलिसांनी पकडला गांजा आरोपी शंकर वर्मा कडून मुद्देमाल जप्त.

 

माजरी प्रतिनिधी :-

जिल्ह्यात दारूबंदी नंतर गांजा अफीम वी ब्राऊन शुगर सारख्या नशीली पदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने सुरू असून तरुण युवा पिढी यामुळे या व्यसनाच्या आहारी जावून बरबाद होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे अशातच यावर पोलीस प्रशासनाचा वचक असणे आवश्यक आहे आणि पोलीस प्रशासन त्यावर प्रतिबंध  कसा करता येईल याचा प्रयत्न करीत सुद्धा आहे.

माजरी येथील बांदा डफाई याठिकाणी एक इसम आपल्या घरी गांजा बाळगून त्याची विक्री करत आहे अशी माहिती माजरी पोलिसांना मिळाल्याने सदर ठिकाणी माजरी पोलिसांमार्फत छापा टाकण्यात आला असता आटोपी नामे शंकर वर्मा हा बांदा डफाई माजरी याचे घरी जवळपास 1 किलो 243 ग्राम गांजा मिळून आला तसेच आटोपीचा मोबाईल व विक्रीचे नगदी असा एकूण 25,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आटोपी शंकर वर्मा यास अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात स्वतः ठाणेदार सपोनि विनीत घागे व सपोनि अजित्सिंह देवरे ,पो हवा चोपणे, नापोशी जुमडे,गुटनुले ,पो भी बैठा ,मोगरम शिंदे ,रामटेके, म पो शी सावे, गोडसे यांनी केली.असून पुढील तपास सपोनि देवटे करीत आहे.

Previous articleधक्कादायक :- वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा,
Next articleदेशमुखांनी १०० कोटीची वसुली मागणे ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here