Home महाराष्ट्र देशमुखांनी १०० कोटीची वसुली मागणे ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना,

देशमुखांनी १०० कोटीची वसुली मागणे ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना,

 

राजसाहेब ठाकरे यांनी मागितला अनिल देशमुखांचा राजीनामा.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्राचे राजकारण सद्ध्या उन्हाळ्याच्या कडक उन्हात तापले असून मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा केल्याने महाराष्ट्रातून ग्रुहमन्त्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत हे सगळे आरोप खोटा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, जर मुंबई पोलीस आयुक्त यांनी दावा केल्याने ही बाब महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी देऊन अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राजसाहेब ठाकरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here