Home चंद्रपूर खळबळजनक :- दारूच्या पेट्या पकडल्यानंतर ५० हजार घेवून आरोपींना सोडणारे ते पोलीस...

खळबळजनक :- दारूच्या पेट्या पकडल्यानंतर ५० हजार घेवून आरोपींना सोडणारे ते पोलीस कोण?

 

ठाणेदारांनी झाडाझडती घेतल्यानंतर संध्याकाळी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल?

क्राईम डायरी :-

अवैध दारू विक्रीच्या धंद्यात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला की काय काय कारणामे होतील व कोणत्या स्वरूपात गुन्ह्यात बदल होतील याचा नेम नसतो, कधी पकडलेल्या दारूचा साठाच गायब होतो तर कधी सापडलेले आरोपी अज्ञात आरोपी होतात तर कधी पकडलेला दारूचा साठा परस्पर विकल्या जातो शिवाय “फैसला ऑन द स्पॉट” म्हणून पैसे घेऊन मामला रफादफा केल्या जातो.अगदी असाच एक वाक्या काही दिवसांपूर्वी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडला असून रात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांनी अवैध दारूच्या दहा पेट्या पकडल्या नंतर जी स्टोरी निर्माण करण्यात आली ती पोलीस प्रशासनाच्या अनुशासन व्यवस्थेला तिलांजली देणारी ठरली आहे, मात्र ते पोलीस कोण? हा प्रश्न सद्ध्या गूलदस्त्यात असून लवकरच त्यांची पोलखोल होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

मागील चालू आठवड्यात दिनांक १५ तारखेच्या दरम्यान एका पोलीस शिपायाच्या सोबत त्याचा सहकारी रात्रीची गस्त करीत होता.त्याच सुमारास एका अवैध दारू विक्रेत्यांचा दहा पेट्या दारूचा साठा या पोलिसांना सापडला,आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने आरोपी ने तब्बल पन्नास हजार रुपये त्या पोलिसांना देण्याचे कबूल केले आणि रात्री उशिरा आर्थिक व्यवहार झाला. परंतु आता पकडलेल्या दारू साठ्यांचे काय? हा प्रश्न उभा असतांना सकाळी ठाणेदार यांना ही खबर लागली आणि संबंधित एका पोलिसाला कैबिनमधे बोलवून खरडपट्टी काढण्यात आली त्यामुळे नाइलाजाने त्या साठ्यांतील पाच पेट्या परस्पर विकल्या गेल्यानंतर केवळ पाच पेट्या अज्ञात आरोपीच्या नावाने दाखवून सायंकाळी अज्ञातआरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या संदर्भात आरोपी यांचे निकटवर्तीय नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या प्रकरणातील संपूर्ण माहिती आता सांगू लागले असून ते पन्नास हजार रुपये घेवून आरोपींना सोडणारे पोलीस कोण?हे जाहीर होणार आहे.

Previous articleदेशमुखांनी १०० कोटीची वसुली मागणे ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना,
Next articleधक्कादायक :- बल्लारपुर शहर बनले कट्ट्याचे शहर, परप्रांतातून देशी कट्टे व माऊजरची आयात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here