Home चंद्रपूर धक्कादायक :- बल्लारपुर शहर बनले कट्ट्याचे शहर, परप्रांतातून देशी कट्टे व माऊजरची...

धक्कादायक :- बल्लारपुर शहर बनले कट्ट्याचे शहर, परप्रांतातून देशी कट्टे व माऊजरची आयात?

 

सूरज  बहुरीया, राजू यादव यांच्या हत्त्यावेळी बल्लारपूर येथीलच कट्ट्याचा वापर.

बल्लारपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून भंगार चोरी सट्टापट्टी,जुगार यामधे काम करणाऱ्यांनी दारूच्या अवैध धंद्यात उतरून कोट्यावधी रुपयाची माया जमवली खरी पण आपल्या भाईगिरीच्या आड येणाऱ्यांना संपविण्याचा खेळ सुद्धा तेवढाच खेळल्या गेला व आता सुद्धा खेळला जात आहे, दुसरीकडे कोळसा ट्रान्सपोर्टर यांच्यात स्पर्धा व अवैध कोळशाच्या विक्रीतून कोट्यावधी रुपयाची उलाढाल यातून आपले साम्राज्य निर्माण करण्याच्या नादात सुद्धा दोन गटात हाणामारी व खून झाले, महत्वाची बाब म्हणजे परप्रांतातून मोठ्या प्रमाणात देशी कट्टे व माऊजर बंदुका या अवैध धंद्यात असणाऱ्यांनी आणल्या व त्या बळावर आपली दादागिरी चालू ठेवली, काहींनी तर या धंद्यात एजंटगिरी करून देशी कट्टे व माऊजर अगदी माफक दरात येथील गावगुंडाना विकल्या असल्याचे दिसत आहे. सूरज बहुरीया व राजू यादव हत्त्याकांड यामधे वापरलेले कट्टे हे बल्लारपूर येथीलच असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने बल्लारपूर हे कट्ट्याचे शहर बनले आहे.

बल्लारपूर येथे दिनांक 18 मार्च रोज गुरुवारी रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शहरातील हद्दपार झालेला(तडीपार)येदुराज उर्फ (बच्ची)रामनरेश आरक रा, सुभाष वॉर्ड हा आरोपी कमरेला खोसून देशी कट्टा (पिस्तूल)घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार उमेश पाटील यांनी आपले सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन वस्ती विभाग सर्च करून मोठया शिफातीने रात्री एक वाजता च्या दरम्यान बच्ची उर्फ येदुराज (29) व साथीदार फारुख ऐय्याश शेख रा, बालाजी वॉर्ड दोघांना मोटारसायकल वर फिरत असतांना ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांचा कडून कमरेला खोसलेली देशी कट्टा (पिस्तूल)व साथीदार फारुख याचा खिशात दोन जिवंत काडतुसे मिळाली दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दोघांवरही कलम 425 भारतीय हत्यार कायदा व142 (महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला.

बल्लारपूर येथे परप्रांतातून देशी कट्टे व माऊजर यासह जिवंत काडतुसे कुठून नेमके कोण आणतोय? आजपर्यंत पकडलेले देशी कट्टे माऊजर व जिवंत काडतुसे यांच्या वापरणाऱ्या आरोपी च्या रिसोर्ससचा मुळात जाऊन तपास पोलिसांनी घेतला का?राजू यादव यांची हत्त्या ज्या माऊजर ने करण्यात आली ते माऊजर बल्लारपूर येथील म्रुत व्यक्तीकडून घेतल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले मग त्या संदर्भात पोलिसांनी नेमका काय तपास केला इत्यादी प्रश्न हे पोलिसांनी फार गांभीर्याने घ्यायला हवे नाहीतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर,राजुरा,घूग्गूस व माजरी येथे गुंडगिरीचे राज्य निर्माण होईल व पोलीस प्रशासनाला मग त्यावर अंकुश लावणे कठीण जाईल अशी जास्त शक्यता आहे.

Previous articleखळबळजनक :- दारूच्या पेट्या पकडल्यानंतर ५० हजार घेवून आरोपींना सोडणारे ते पोलीस कोण?
Next articleधक्कादायक :- औधोगिक प्रशिक्षण घेतअसलेल्या पराग चा डागा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here