Home चंद्रपूर सन्मान :- सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू ह्या नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन अवार्डने...

सन्मान :- सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू ह्या नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन अवार्डने सन्मानित.

 

सामजिक कार्याचा सर्वोत्कृष्ट सन्मान.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

सामजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व अनेक सामजिक संघटनेत आपले सर्वोच्य योगदान देणाऱ्या सरिता मालू यांना दिल्ली येथील नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते व त्यांना मानवी अधिकार या संदर्भात आयोजित सेमिनार मधे नेशनल एक्सलेन्सी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान उत्तर प्रदेश चे कामगार व रोजगार मंत्री रघूराज सिंह यांच्या हस्ते देण्यात आला.

सरिता मालू ह्या फ्रेंड चैरिटी ग्रुप च्या अध्यक्षा असून जेसीआई राजुरा प्राईड याच्या त्या माजी अध्यक्षा पण आहे. कोरोना महामारी काळात त्यांनी चंद्रपूर शहरात सुरक्षेसाठी उपस्थित पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत नाश्ता व चहा वाटप करून गोरगरिबांना अन्न धान्न्य वाटप केले महेश्वरी समाज महिला मंडळाच्या जिल्हा सदस्या म्हणून कार्यरत सरिता मालू यांना अनेक सामजिक संघटनेद्वारे व संस्था द्वारे वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच दिल्ली येथील नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेने त्यांचा सन्मान केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

Previous articleसन्मान :- सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू ह्या नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन अवार्डने सन्मानित
Next articleगृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here