Home चंद्रपूर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

 

चंद्रपूरच्या गांधी चौकात माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलाने बदडले.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी खोटे आरोप करून एका निष्कलंक व स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यावर लांच्छन लावल्याबद्दल स्थानिक गांधी चौकात महापालिकेसमोर परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला. सोबतच भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सुशांत सिंग, कंगना राणावत,सारखे तथ्यहीन मुद्धे उचलून महाराष्ट्र पोलीस व महाआघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्राच्या विरोधात भारतीय जनता पक्ष व या पक्षाच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. आजच्या या निषेध निदर्शने नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,शहर अध्यक्ष श्री.राजीव कक्कड,ज्येष्ठ नेत्या सौ.शोभाताई पोटदुखे,श्री.हिराचंद बोरकुटे,मुनाज शेख, महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके,शहर महिला अध्यक्षा सौ.ज्योती रंगारी,नगरसेवक श्री.दीपक जयस्वाल, व सौ.मंगला आखरे,सेवादल जिल्हाध्यक्ष श्री.महादेवराव पिदुरकर,विलास नेरकर,श्री रमेश माखेजा, राजेंद्र वरघणे,बनडुजी डाखरे,श्री. डी.के आरिकर,श्री.सुनील दहेगावकर,श्री.सुनील काळे,श्री.प्रियदर्शन इंगळे,डॉ देव कंनाके, निमेश मानकर,सुधाकर रोहनकार,फयाज शेख, नितीन पिपळशेंडे, सरस्वती गावंडे,वंदना आवडे,दिलीप पिटलवार,डॉ आनंद अडबाले,प्रमोद देशमुख,ममता गोजे,प्रीती लभाने, विनोद लभाने, सूरज चव्हाण,नंदा शेरकी,छबिया देवगडे, सौ दुर्गा बिसवास, धननजय दानव,प्रवीण काकडे,राकेश सोमाणी,अमर रहिकवार,आरिफ खान,दीपक गोरडवार,राजेंद्र आखरे, रवी नेचपलवार,सौ छाया प्रसाद वर्मा,प्रज्ञा पाटील,बिपीन देवगडे,रोशन कोमरेडीवार,अंकित निवलकर,इत्यादी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील व चंद्रपूर शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleसन्मान :- सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू ह्या नेशनल ह्यूमन राईट ऑर्गनायजेशन अवार्डने सन्मानित.
Next articleग्रा. पं बेटाळा “बनावट भोगवटा प्रमाणपत्रा” द्वारे शासनाची दिशाभूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here