Home भद्रावती खळबळजनक :- दिड हजार लाच घेतांना मंडळ अधिकारी प्रशांत बैस लाचलुचपत प्रतिबंधक...

खळबळजनक :- दिड हजार लाच घेतांना मंडळ अधिकारी प्रशांत बैस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पटवारी ते मंडळ अधिकारी असा भ्रष्ट प्रवास केलेल्या बैस चा अखेर बुरखा उघडला.

भद्रावती प्रतिनिधी :-

वरोरा भद्रावती या तालुक्यात पटवारी ते मंडळ अधिकारी असा प्रवास करतांना शेतकऱ्यांकडून फेरफार च्या नावाखाली व विविध योजनेत पैसे घेणाऱ्या प्रशांत बैस यांनी जमिनीचे फेरफार करण्यासाठी तक्रारदाराला 2 हजार रुपयांची लाच मागितल्याने त्या मंडळ अधिकारी बैस यांना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने आज रंगेहात अटक केली.

चंदनखेडा मौजा चरुर घारापुरी येथील सर्व्हे क्रमांक 129/2 मधील 1 हेक्टर 62 आर जमिनीचे फेरफार करून देण्याचा कामासाठी तक्रारदाराला 2 हजार रुपये लाच मागितली मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने याबाबत त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 1 एप्रिलला तहसील कार्यालय भद्रावती येथे प्रशांत बैस यांना 1 हजार 500 रुपये घेताना रंगेहात अटक केली. सदर कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील कर्मचारी यांनी . यशस्वीपणे पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here