Home ब्रम्हपुरी बनवाबनवी:- यंग इंजिनिअर एज्यू. सोसायटी कुरखेडा या संस्थेच्या आर्थिक दबावतंत्राने सरपंच्याचे बयान...

बनवाबनवी:- यंग इंजिनिअर एज्यू. सोसायटी कुरखेडा या संस्थेच्या आर्थिक दबावतंत्राने सरपंच्याचे बयान बदलले?

 

ग्रा.पं. बेटाळा”बनावट भोगवटा प्रमाणपत्र”प्रकरणात तत्कालीन सरपंचांची भूमिका संशयास्पद?

ब्रम्हपुरी वार्ता :-

यंग इंजिनिअर एज्यू. सोसायटी कुरखेडा अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी डी फार्म व बी फार्म कॉलेज बेटाळा येथील संस्थेवर “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणा बाबत दाखल तक्रारीवर तत्कालीन सरपंच विद्या विलास मेश्राम यांनी ग्रामपंचायत ठराव, गट विकास अधिकारी यांना दिलेला चौकशी अहवाल आणि पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांना दिलेल्या बयानात मोठी विसंगती आढळून येत असल्याने बनावट भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणात सरपंचाच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. बी फार्म,डी फार्म कॉलेज बेटाळा तालुका ब्रह्मपुरी या संस्थेने पुनर्मान्यते करिता लागणारा भोगवटा प्रमाणपत्र मिळवीण्यासाठी ग्रामपंचायत बेटाळा कार्यालयाचा बनावट लेटर पॅड, इंग्रजी मजकुरातील असलेल्या बनावट भोगवटा प्रमाणपत्रावर सरपंच व ग्रामसेवक यांची खोटी सही आणि शिक्का वापरून भोगवटा प्रमाणपत्र तयार केल्याबाबत ग्रामपंचायत ला प्राप्त गट विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांनी मागवलेल्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत बेटाळा येथे 23-12-2019 ला तत्कालीन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सभासद आणि सचिव यांच्या उपस्थितीत साधक-बाधक चर्चा व शहानिशा करून, ग्राम पंचायतीने इंग्रजी मजकुरातील कुठलाही भोगवटा प्रमाणपत्र संस्थेला दिलेला नाही व सरपंच यांचे नाव चुकीचे दर्शवून खोट्या सही व शिक्क्या निशी प्रमाणपत्र तयार केल्याचे ठरावात नमूद करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत मासिक सभा 13-01-2020 ला संबंधित संस्थेला भोगवटा प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेले नसून सदर प्रमाणपत्र खोटे असल्याने या संस्थे विरुद्ध पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदवावी असे तत्कालीन सरपंच्याच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सभेत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला मात्र 28-01-2020 ला गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या चौकशी अहवालाला बयान देताना सरपंचांनी ग्रामपंचायत मध्ये घेतलेल्या ठरावाच्या विसंगत बयान देत सांगितले की, संस्थेने ग्रामपंचायतला भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज सादर केलेला होता.पण ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये भोगवटा प्रमाणपत्र देणे बाबत ठराव घेण्यात आलेला नाही. सदर इंग्रजी मजकुरातील भोगवटा प्रमाणपत्र मी स्वतः सौ मनीषा मेश्राम अशी स्वाक्षरी ने दिलेला असून सौ मनीषा मेश्राम नावाने केलेली स्वाक्षरी माझे टोपण नाव आहे आणि सदर प्रमाणपत्राच्या कार्यालयीन प्रती ग्राम पंचायत कार्यालयात उपलब्ध नाहीत.तर मी पो. स्टे.ब्रम्हपुरी ला दिलेल्या बयानाची प्रत कोणालाही देण्यात येऊ नये असे लेखी निवेदन सुद्धा सरपंच यांनी पो. स्टे. ला दिलेले आहे तर तात्कालीन सचिव शेंडे आणि विद्यमान सचिव लांजेवार यांनी चौकशी अहवाला ला दिलेल्या बयानात संस्थेने पुनःमान्यते साठी ग्रामपंचायत बेटाळा चे बनावट लेटर पॅड बनवून खोटे सही व शिक्का मारून बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार केल्याचे स्पष्ट केले. आणी ग्रामपंचायतला भोगवटा प्रमाणपत्राची मागणीच झाली नसल्याने ग्रामपंचायत दप्तरी याची नोंदच नाही अशी भूमिका घेतली.

बनावट भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणात तत्कालीन सरपंच यांनी घेतलेल्या दुतोंडी भूमिकेने शासनाची दिशाभूल होत असून ग्रामपंचायत मधील बहुमताच्या ठरावाचा सन्मान न करता वरिष्ट अधिकार्‍यांसमोर बयान फिरवणे असला प्रकार सरपंच पदाच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारा आहे आणि न्यायिक स्वरूप विस्कळीत करणारा आहे, व भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार सरपंचाला नसताना पदाचा दुरुपयोग करून सदर प्रमाणपत्र दिलेच कसे ? अशी जनमानसात चर्चा आहे.

Previous articleधक्कादायक ;- पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीलाच ठाणेदाराने केली शरीरसुखाची मागणी.
Next articleखळबळजनक :- दिड हजार लाच घेतांना मंडळ अधिकारी प्रशांत बैस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here