Home चंद्रपूर धक्कादायक :-स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलेल्या झोटिंग माता पित्याची अनोखी क्रूर खेळी?

धक्कादायक :-स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलेल्या झोटिंग माता पित्याची अनोखी क्रूर खेळी?

 

एकीकडे आपसात समझोता करण्यासाठी मध्यस्थी तर दुसरीकडे मुलाला घरून हटविण्यासाठी न्यायालयाचा आधार? आता फैसला सामाजिक न्यायालयात? 

लक्षवेधक :-

“जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगातें उद्धारी” असे आई बद्दल गौरवोद्गार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी बोलून दाखवले पण तीच आई जर मुलाची वैरीन होत असेल तर? ….नाही, असे शक्य नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या नव्यानव टक्के असेल, पण होय ती आई च स्वतःच्या मुलाची वैरीन कशी आहे याचे जिवंत उदाहरण झोटिंग परिवारातला अंतरकलह बघून मिळत आहे.

झोटिंग परिवारात पती पत्नी दोघेही पेशाने शिक्षक पण शिक्षकी पेशाला कलंकच म्हणावे लागेल कारण शिक्षक म्हणून त्यांनी मुलांना जे ज्ञान दिले असेल त्यात त्यांनी असे कधी शिकवले नसेल की तुम्ही आपल्या मुलाला घराच्या बाहेर काढा पण हकिगत मधे त्यांनी आपल्या पोटच्या मुलाला नातवाला आणि सुनेला घराच्या बाहेर काढण्यासाठी केवळ प्रयत्नच केले नाही तर चक्क छडयंत्र चालवले आहे आणि मुलगा असा सहज ऐकणार नाही म्हणून न्यायालयात आपल्या सख्ख्या म्हाताऱ्या आईला समोर करून खोटी तक्रार पोलीस स्टेशन मधे द्यायला लावल्या एवढेच नाही तर कायद्याचा आधार घेत बनावट कहाण्या तयार करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत ज्येष्ठ नागरिक हक्क कायद्यांतर्गत स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न त्या आईने चालवला आहे.पण दुःख ह्या गोष्टीचे आहे की बाबा पण त्याच माळ्याचे मनी असून त्यांची मूक संमती म्हणजे त्यांच घरात काहीच चालत नाही हे शीद्ध होते.

आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून शशांक कधीही आत्महत्या सारखा प्रकार करू शकतो?

झोटिंग परिवाराच्या या नात्याला कलंकित करणाऱ्या किळसवाण्या घटनेचा वेध घेत भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर काही दिवसापूर्वी बातमी प्रकाशित झाली होती की आई मुलाची अशी कशी वैरीन होऊ शकते? ही बातमी महाराष्ट्रात सगळीकडे पोहचली आणि त्या बातमी वरून कदाचित त्या आई वडिलांना लोकलज्जास्तव मुलाला समझोता करण्याचे निमंत्रण त्यांच्या वकिलांकडून मिळाले त्यामुळे अगोदरच आर्थिक द्रुष्टीने पूर्णतः बरबाद झालेल्या शशांक झोटिंग व त्याच्या पत्नीला वाटल की आता आई बाबा आम्हांला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल आणि त्यामुळे त्यांनी वकिलांना आपल्याला आई वडिलांकडून काय हवे याची यादी दिली पण ज्या आईच्या मनात मुलांविषयी वैरीन बसली असेल तिला समाधान कसे होणार? आणि लागलीच त्या आईने आपल्या कायद्याचा आधार घेत मुलाला आणि सुनेला न्यायालयाचा धाक दाखवत नोटीस पाठवला.म्हणजे एकीकडे समझोता करण्यासाठी आम्ही तयार आहो म्हणून मुलाला गाफील ठेवायचे आणि आपले छडयंत्र रचून मुलाला घराबाहेर काढण्याचा दबाव आणायचा असला क्रूरपणा आई आणि वडिलांनी शशांक झोटिंगच्या बाबतीत चालवला असल्याने ही आई आहे की वैरीन आणि ते वडील आहे की राक्षस? असाच प्रश्न उभा राहत आहे, कारण आइची सवेंदना हरपली आणि बापाची आपुलकी संपली की मुलाचा संसार उध्वस्त होतो अगदी अशीच परिस्थिती शशांक झोटिंग ची झाली असून त्याने एक दिवस स्वतःच्या खोलीत गळफास लावला होता तर दुसऱ्यांदा अति दारू सेवन करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता आणि तो आई वडिलांच्या या मानसिकतेमुळे कधीही स्वतःला संपवू शकतो अशी भयंकर परिस्थिती आई वडिलांनी तयार केली असून जर त्याने काही कमी जास्त केल तर आई वडील व त्याचा भाऊ अतुल पण जेल ची वारी करू शकतात असे चित्र दिसत आहे.त्यामुळे त्याचे कमी जास्त होण्याच्या अगोदर समाजाच्या न्यायालयात हा फैसला होणार का? शशांक चे नातेवाईक यासाठी पुढाकार घेणार का? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here