Home भद्रावती खळबळजनक :- एका २० वर्षीय युवतीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ?

खळबळजनक :- एका २० वर्षीय युवतीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ?

 

लग्नाच्या वयात आत्महत्त्या केल्याने सर्वत्र हळहळ, आत्महत्येचे कारण गूलदस्त्यात?

भद्रावती प्रतिनिधी :-

कोरोना च्या महामारीत एकीकडे लोकांचा जीव जात असून दुसरीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याने समाजमन हेलावून जात आहे अशीच एक दुःखद घटना भद्रावती शहरात आज सकाळी १० ते दुपारी २  वाजे दरम्यान घडली असून आरती जयप्रकाश चटपल्लिवार वय २० राहणार बाजार वार्ड हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेईन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

जयप्रकाश चटपल्लिवार हे भद्रावती न्यायालयात अटर्नि म्हणून मागील अनेक वर्षापासून कार्यरत असून अत्यंत साधे सरळ असे व्यक्तिमत्व असलेले जयप्रकाश चटपल्लिवार यांची मुलगी आई बाहेर गावी गेल्यामुळे व वडील आपल्या कामावर गेल्यामुळे एकटे असताना दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडली पण त्या मुलीने नेमकी आत्महत्या का केली? तिच्या आत्महत्या करण्यामागे कोण आहे? इत्यादी प्रश्न अनुत्तरित असून अवघ्या २० वर्षाच्या वयात लग्नाची वेळ असताना आत्महत्या करावी ही अत्यंत दुर्दैवी घटना असून भद्रावती शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleधक्कादायक :-स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलेल्या झोटिंग माता पित्याची अनोखी क्रूर खेळी?
Next articleखळबळजनक :- करोनाची लस घेतलेल्या सात जणांचा दुर्दैवी मृत्यु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here