Home भद्रावती खळबळजनक :- तर तालुका सहाय्यक निबंधक पोथारे यांच्यावर सुद्धा होऊ शकते ...

खळबळजनक :- तर तालुका सहाय्यक निबंधक पोथारे यांच्यावर सुद्धा होऊ शकते फौजदारी कारवाई?

 

आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्था संचालकांच्या भ्रष्टाचारात पोथारेची क्रूपा?

भ्रष्ट संचालक समिती भाग -८

बहुचर्चित आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या आर्थिक घोटाळ्यात भद्रावती तालुका सहाय्यक निबंधक पोथारे यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे तेंव्हाच जाहीर झाले जेंव्हा त्यांनी भ्रष्टाचारी संचालकाना पाठीशी घालून रवी मांढळकर यांच्या चौकशी अहवालावर पुनः चाचणी लेखापरीक्षण ७ दिवसात पुर्ण करण्याचे आदेश रवी मांढळकर यांना दिले होते. मात्र यानंतरही संचालकांवर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे तक्रारकर्त्यानी रवी मांढळकर यांच्या अहवालावरून संचालकांवर कारवाई करण्यास तालुका सहाय्यक निबंधक हे कसूर करीत असल्याने उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात केस क्रमांक 76/2020 नुसार पिटिशन दाखल केली. या वरून संबंधित संचालक,तालुका सहाय्यक निबंधक,व इतरांना नोटीस पाठविण्यात आले होते. पण मागील वर्षीच्या कोरोना काळात नंतर उच्च न्यायालयात सुनावणी झाली नसल्याने दरम्यान भ्रष्ट संचालकांनी विभागीय सह निबंधक यांच्याकडे अपील केली व रवी मांढळकर यांचा अहवाल नीरस्त करून नव्याने पुन्हा अहवाल तयार करण्याचे आदेश मिळवले.

सहाय्यक तालुका निबंधक पोथारे यांचे रवी मांढळकर यांच्याकडे बोट?

आता तक्रारकर्त्यानी जी पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती त्यामधे दिनांक 2/3/2021 ला न्यायालयाने रवी मांढळकर यांच्या चौकशी अहवालामधे नमूद बाबी लक्षात घेता त्यावर तक्रारकर्त्यानी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या तक्रारी प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत (Maharashtra Co operative Societies Act, 1960) उचित कारवाई करावी असे आदेश दिले आहे, त्यामुळे भ्रष्ट संचालकांवर फर्निचर बांधकाम. हेल्मेट खरेदी.डेटा सेंटर कोटेशन इत्यादी बाबत फौजदारी कारवाई होईल हे निश्चित असतांना तालुका सहाय्यक निबंधक पोथारे हे स्वतः एक जबाबदार अधिकारी असतांना आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या दोषी संचालकांवर कारवाई न करता उलट रवी मांढळकर यांच्या कडे बोट दाखवून त्यांनी पोलीस स्टेशन मधे दोषी संचालकांविरोधात तक्रार द्यावी असे सांगत आहे तर दुसरीकडे रवी मांढळकर हे आपल्याला जर सहाय्यक निबंधक पोथारे यांनी लेखी आदेश दिला तर आपण पोलीस स्टेशन मधे संचालकांविरोधात तक्रार द्यायला तयार आहो असे म्हटले आहे. आणि ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की ज्याअर्थी तालुका सहाय्यक निबंधक यांना अधिकार आहे की ते संचालक मंडळ बरखास्त करू शकतात किंव्हा एखाद्या संस्थेत ते प्रशासक बसवू शकतात तर एखाद्या पत संस्थेत झालेला भ्रष्टाचार हा जर चौकशीत शीद्ध होत असेल तर दोषी संचालकांविरोधात पोलीस स्टेशन मधे तक्रार देवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास काय हरकत आहे?

तर पोथारे यांच्यावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक?

आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्था संचालक यांनी आमदार खासदार व इतर नेत्यांकडून आपला बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु हे संचालक स्वतः केंद्र शासनाचे कर्मचारी असून सुरक्षा संबंधित अति महत्वपूर्ण विभागात ते नौकरी करतात जर अशा सरकारी कर्मचारी यांच्याकडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असेल तर ह्या संचालकांवर आपल्या कर्तव्यास एकनिष्ठ नसल्याचा ठपका ठेवून त्यांना पदावरून तसेच नौकरी वरून सुद्धा काढून टाकायला हवे कारण या पत संस्थेत सरकारी कर्मचारी यांचे पैसे जमा आहे आणि त्यांच्या पैशाचा असा दुरुपयोग करून जर लाखो रुपयाचे गभण केल्या जात असेल तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि यामधे सहाय्यक तालुका निबंधक पोथारे यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे एकूणच त्यांच्या भूमिकेवरून दिसत आहे त्यामुळे  त्यांच्यावर सुद्धा विभागीय चौकशी होऊन कारवाई होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here