Home चंद्रपूर एल्गार :- कंस मामा गोरख गुप्तांच्या विरोधात भाचा संजय गूप्ताचा होणार एल्गार?

एल्गार :- कंस मामा गोरख गुप्तांच्या विरोधात भाचा संजय गूप्ताचा होणार एल्गार?

 

पोलीस कर्मचारी महेश मांढरे यांचे पाठबळ असल्याने भाचाचे 36 लाख परत करण्यास गोरखची टाळाटाळ?

घूग्गूस न्यूज नेटवर्क.

पैशासाठी कोण कुणाला कधी ठार मारेल व दुसऱ्याचे पैसे हडपन्यासाठी कोणत्या स्थराला जाईल याचा नेम या युगात देणे शक्य नसले तरी आपल्या सख्ख्या भाचाला तब्बल 36 लाखांनी फसविल्याची बहूदा महराष्ट्रातील ही पहिलीच घटना असेल की आपल्या सख्ख्या मामाने द्वापर युगातील क्रूर कंस मामाला मागे टाकून आपल्या सख्ख्या भाच्याचे पैसे हजम करून आपल्या घरातून त्याला बाहेर काढले इतकेच नव्हे तर आपल्या सख्ख्या भाच्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याचा संसार रस्त्यावर आणला.पण आता भाचा संजय गुप्ता यांनी सुद्धा दंड थोपटले असून कंस मामा गोरख गुप्ता यांच्या विरोधात एल्गार पुकारला असल्याची माहिती आहे.

घूग्गूस येथील या कंस मामांची क्रूर कहाणी ऐकतांना कुण्याही साधरण माणसाचा राग अनावर होऊन तो त्या कंस मामाच्या थोबाडात दोन चार हाणल्या शिवाय राहणार नाही पण इकडे “सदरक्षनाय खलनिग्रहनाय” हे ब्रीद वाक्य ज्यांच्या वर्दीवर आहे अशाच पोलीस कर्मचारी असलेल्या महेश मांढरे यांची साथ असल्याने क्रूर कंस मामांला जरा जास्त माज चढला आहे आणि तो आपल्या भाच्याला खुलेआम धमकी देऊन “तेरे पैसे नही देता जो उखाडना है उखाड” म्हणून इशारा देतो म्हणजे या क्रूर कंस मामांची दादागिरी कुणाच्या भरोशावर आहे हे शीद्ध होत असून आता पोलीस कर्मचारी महेश मांढरे हा गोरख गूप्ताच्या घरी किरायाने किती दिवसापासून राहतो व त्याचे घूग्गूस पोलीस स्टेशन च्या डी बी पथकात काय काम आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याच्या कार्यकाळात काय काय उचापती केल्या त्याची संपूर्ण माहिती लवकरच उजेडात येणार असून कंस मामा गोरख गूप्ताच्या संपती ची चौकशी व त्यांनी एवढी मालमत्ता कशी जमवली याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे शिवाय ट्रांसपोर्ट च्या संदर्भातील माहिती सुद्धा संकलित होत आहे अर्थात त्यावरून त्यांच्यावर कशी कारवाई होईल ते दिसेलच. पण त्यामुळे एक गरीब लाचार कमजोर असलेला पिडीत संजय गुप्ता याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करू या.

Previous articleधक्कादायक :- सख्ख्या पुतण्यानेच केला काकाचा खून.
Next articleब्रेकिंग न्यूज :- राज्यात १ मे च्या सकाळ पर्यंत संचारबंदी लागू, काय सुरू राहणार काय बंद?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here