Home वरोरा धक्कादायक :- सख्ख्या पुतण्यानेच केला काकाचा खून.

धक्कादायक :- सख्ख्या पुतण्यानेच केला काकाचा खून.

 

दारूच्या नशेत असलेल्या काकाने भांडण केल्याच्या कारणावरून पुतण्याच्या राग अनावर?

क्राईम न्यूज :-

खेड्यात आता दारूचे व्यसन म्हाताऱ्या पासून जवानांपर्यंत खूप वाढले असून त्यामुळे गावखेड्यात भांडण तंटे वाढले आहे अशातच वरोरा तालुक्यातील खेमजई येथे सख्ख्या पुतण्याने सख्ख्या काकांचा काठीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा खून दारूच्या नशेत असलेल्या काकांच्या भांडणामुळे झाल्याचे समोर आले आहे.

मृतक कवडू जितरु दडमल वय 70 वर्षे हा दारू पिऊन रोज वाद करायचा काल रात्री 8 च्या दरम्यान आरोपी यशवंत भाऊराव दडमल वय 30 वर्षे याचा व काकांचा वाद झाला. आरोपी यशवंतचा राग अनावर झाल्याने रागाच्या भरात त्याने काठीने आपल्या काका कवडूवर वार केला असता कवडू गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारा करिता दवाखान्यात नेले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले आरोपी यशवंत दडमल वर कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला .पुढील तपास शेगावचे ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहे.

Previous articleब्रेकिंग :- पुन्हा चिंता वाढली 24 तासात 974 पॉझिटिव्हसह 10 कोरोना बाधितांचा मृत्यू.
Next articleएल्गार :- कंस मामा गोरख गुप्तांच्या विरोधात भाचा संजय गूप्ताचा होणार एल्गार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here