Home चंद्रपूर मद्यपिना खुशखबर:- आता लॉक डाऊन च्या काळात घरपोच मद्य मिळणार?

मद्यपिना खुशखबर:- आता लॉक डाऊन च्या काळात घरपोच मद्य मिळणार?

 

मुख्यमंत्र्यांनी राखली मद्यपी ची लाज पण रस्त्यांवर न येण्याचे केले आव्हान?

लक्षवेधक:-

एकीकडे १५ एप्रिल पासून कडक लॉक डाऊन ची घोषणा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवली तर दुसरीकडे घरात राहून जनता करणार काय? ह्या प्रश्नाला गांभीर्याने घेवून त्यांनी मद्यपी ची लाज राखून घरपोच मद्य मिळणार असल्याचे सूचित केल्याने मद्यपी मधे आनंदाचे वातावरण आहे.

मागील आठवड्यात सात ते आठ दिवस महाराष्ट्रात दारूच्या दुकानांना व बियर बार आणि देशी भट्टी यांना उत्पादन शुल्क विभागाने टाळे लावल्याने मद्यपीना नाहक त्रास सहन करावा लागला, एवढेच नव्हे तर सहज ३०० रुपयाला मिळणारी बॉटल सरळ ५०० रुपयावर गेली होती त्यामुळे मद्यपी चे आर्थिक बजेट बिघडले होते त्यामुळे त्यांनी शासनाच्या या निर्णयाचा मोठा विरोध केला होता अर्थात यामधे लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे स्वतः मद्यपी च्या कक्षेत येत असल्याने त्यांचा विरोध पत्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महागात पडले असते त्यामुळे त्यांनी मद्यपी यांना खुशखबर देऊन ऑनलाईन दारू मिळणार असल्याचे संकेत दिले आहे.मात्र दारू पिऊन  रस्त्यांवर येऊ नका असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मिळणार ऑनलाईन दारू?

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा होत आहे मात्र मध्यंतरी वणी नागपूर येथे उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या दुकानांना टाळे व शील लावल्यानेचंद्रपूर जिल्ह्यात दारूचा मोठा तुटवडा पडला होता व अवैध दारूच्या बॉटल चे भाव गगनाला भिडले होते मात्र आता ज्यांना पोलिसांकडून अधिकृत परवानगी आहे व लोकप्रतिनिधी यांचा आशीर्वाद आहे त्या दारू विक्रेत्यांची दारू चंद्रपूर ला नियमित पुरवठा होण्यास तत्वात मान्यता मिळाली असल्याचे बोलल्या जात आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- राज्यात १ मे च्या सकाळ पर्यंत संचारबंदी लागू, काय सुरू राहणार काय बंद?
Next articleचिंताजनक :- 13 कोरोना बाधितांच्या मृत्यूसह 24 तासात 1235 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here