Home चंद्रपूर अभिनंदनीय :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे संचालक रवींद्र शिंदे यांचे जिल्हाधिकारी...

अभिनंदनीय :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे संचालक रवींद्र शिंदे यांचे जिल्हाधिकारी यांना आवाहन.

 

तालुका स्तरांवर प्राथमिक आरोग्य सेवा द्या मी मोफत 700 ते 1000 रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करतो.

लक्षवेधक :-

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितां चा आकडा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील आरोग्य सेवा ढासळली आहे अशातच आता तालुका स्तरांवर कोविड हॉस्पिटल विकशित करून वाढलेल्या रुग्णांना सुविधा दिल्यास शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयावरील ताण कमी होऊ शकते पण त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर लोकांची तालुका स्तरांवर प्राथमिक सेवा उपलब्ध करून द्यावी मी 700 ते 1000 रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था मोफत करतो असे आवाहन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे संचालक रवींद्र शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना केले आहे.

सीडीसीसी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी या आशयाची पोस्ट फेसबुक वर टाकली असून त्यांच्या या पर्यायाचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन केल्या जातं आहे, अर्थात आता कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागले असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका स्तरांवर कोविड सेंटर उभारणे काळाची गरज आहे, त्यामुळे जिथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी याकडे डोळेझाक केली तिथे रवींद्र शिंदे सारखे व्यक्ती सामाजिक जाणिवेने जर असे आवाहन करीत असेल तर त्यांच्या आवाहनाला जिल्हाधिकारी गूल्हाने यांनी प्रतिसाद दिला पाहिजे तरच कोरोना च्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यात मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी गूल्हाने खरंच यावर त्वरित अमलबजावणी करणार की रवींद्र शिंदे यांनी सामाजिक जानीवेतुन केलेले आवाहन थंड बस्त्यात टाकणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleदुःखद वार्ता :- साऊथच्या विवेक या अभिनेत्याचे हार्ट अटॅकने दुःखद निधन.
Next articleसामाजिक उपक्रम :- भद्रावती येथे एकलव्य युवा संघटना व टायगर ग्रुप च्या वतीने पानपोई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here