Home भद्रावती सामाजिक उपक्रम :- भद्रावती येथे एकलव्य युवा संघटना व टायगर ग्रुप च्या...

सामाजिक उपक्रम :- भद्रावती येथे एकलव्य युवा संघटना व टायगर ग्रुप च्या वतीने पानपोई.

 

रखरखत्या उन्हात वाटसरूंना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागू नये म्हणून युवकांचा स्तुत्य उपक्रम.

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती शहरात गाव खेडयांतून लोक बाजारासाठी किंव्हा इतर शासकीय कामकाजासाठी येत असतात पण रखरखत्या उन्हात आता एकीकडे कोरोना महामारी असल्याने पाणी प्यायला मिळणे कठीण झाले आहे, अशातच नगर प्रशासनाला सुद्धा भद्रावती शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे गाव खेडयांतून येणाऱ्या प्रवाशांना व वाटसरूंना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे त्यांना सुविधा मिळावी या सामाजिक जाणीवेने एकलव्य युवा संघटना व टायगर ग्रुप भद्रावतीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्दळीचे ठिकाण असलेल्या नवीन बस स्थानक परिसर व गांधी चौक परिसर येथे दोन तृष्णा तृप्ती केंद्र (पाणपोई) मराठी नव वर्षाच्या दिनी उद्घाटन करून लोक सेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

त्यांच्या या सामाजिक उपक्रमाच्या पानपोई चे उद्घाटन भद्रावती नगरपरिषद अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी सिकंदर भाऊ शेख, पप्पू भाऊ शेख, प्रितम देवतळे अध्यक्ष एकलव्य युवा संघटना, वैभव मेश्राम उपाध्यक्ष एकलव्य युवा संघटना, टायगर ग्रुपचे रुपेश भाऊ मांढरे, कृष्णा भाऊ तुरानकर, अथर्व भके, अभिषेक कुबडे, प्रफुल बोरकर, दीपक कुळमेथे, विकास सोनुले, फाल्गुन लांबडे, कबीर देवगडे, सौरभ पिसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here