सामाजिक कार्यकर्ता मुन्ना पाठक यांचा आरोप.
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहरात एकमेव असलेल्या कोविड सेंटर मधे मूलभूत सुविधेचा अभाव असून इथे टेस्टिंग करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या रांगा ह्या सामाजिक अंतर ठेऊन नसल्याने इथे एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तींना होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व बसण्याची सुविधा नसल्याने इथे येणाऱ्या व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे वरोरा हे हॉट स्पॉट बनण्याचा मार्गावर असतांना प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पुन्हा नव्याने रुग्णांची वाढ होतं आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व तहसील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून कोरोना च्या भयंकर परिस्थिती तून नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक यांनी प्रशासनाकडे केली आहे.