Home Breaking News दुःखद वार्ता :- साऊथच्या विवेक या अभिनेत्याचे हार्ट अटॅकने दुःखद निधन.

दुःखद वार्ता :- साऊथच्या विवेक या अभिनेत्याचे हार्ट अटॅकने दुःखद निधन.

 

मरणाच्या एक दिवसांपूर्वी त्यांनी घेतली होती कोरोनाची लस.तर्कवितर्काना उधाण?

निधन वार्ता :-

एकीकडे देशभरात कोरोना ने परत एकदा थैमान घातले असल्याने रोज हजारो लोकांच्या निधनाच्या वार्ता ऐकावयास मिळत आहेत. तर दुसरीकडे गेल्या वर्षी अभिनय क्षेत्रातील काही दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला होता. आता परत अभिनय क्षेत्रातील एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. साऊथ इंडस्ट्री मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना खळखळून हसविणारे जेष्ठ अभिनेते विवेक यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 16 एप्रिल रोजी विवेक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चेन्नईच्या एका दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. ते निधनापूर्वी आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली होते. परंतु, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विवेक यांची प्राणज्योत मावळली.

विवेक यांच्या निधनाची घटना वाऱ्यासारखी देशभरात पसरली व सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या अभिनय कौशल्याने गेली 3-4 दशके प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विवेकच्या अकाली निधनाची वार्ता अनेकांना धक्का देऊन गेली. विशेष करून झटका येण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 15 एप्रिल रोजी विवेक यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here