Home चंद्रपूर नियुक्ती :- शोभा वाघमारे यांची महिला सेनेच्या उपजिल्हा अध्यक्षा म्हणून नियुक्ती.

नियुक्ती :- शोभा वाघमारे यांची महिला सेनेच्या उपजिल्हा अध्यक्षा म्हणून नियुक्ती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार आणि महिला जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या नेत्रूत्वात अनेक महिलांचा मनसेत प्रवेश.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जात असून गोरगरिबांना व अन्यायाग्रस्ताना मदत केल्या जाते त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यां चा मनसेकडे ओघ निर्माण झाला आहे व अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार आणि महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या नेत्रूत्वात शिवसेनेच्या शोभा वाघमारे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात महिलांनी मनसेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी शोभा वाघमारे यांची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपजिल्हा अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली

याप्रसंगी शोभा वाघमारे यांच्यासोबत योगीता वनकर, राधिका कांकर नंदिनी वनकर, चित्रा भवरकर आदिती झाडे पल्लवी झाडे प्रिया झाडे जया वाघमारे कल्याणी वाघमारे अश्विनी वानकर, शशीबाई खनके.सुमन वानकर.मुक्ताबांई बानकर.भारती बानकर इत्यादींनी मनसेत प्रवेश केला …यावेळी मनसे नगरसेविका सीमा रामेडवार,जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर संघटक मनोज तांबेकर,वर्षा भोमले उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here