Home लक्षवेधी लक्षवेधी :- इकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या अभावाने कोरोना रुग्ण मारताहेत तर दुसरीकडे 60...

लक्षवेधी :- इकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या अभावाने कोरोना रुग्ण मारताहेत तर दुसरीकडे 60 हजार इंजेक्शनचा साठा?

 

सत्ताधारी आणि विरोधकांच्या श्रेयवादात हजारो रुग्णांचा मृतू गेला त्याचे काय?

लक्षवेधी :-

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राजकारण श्रेय वादातून पेटत असतांना कोरोनाच्या उपचारांमधे महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या जवळपास 60 हजार इंजेक्शनचा साठा कंपनी कडे असल्याचा व भाजप नेत्यांनी तो विकत घेतला असल्याचा परस्पर दावा होत आहे, मात्र इकडे हजारो रुग्णांना ह्या इंजेक्शन अभावी जीव गमवावा लागत असल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्या श्रेयवादात कोरोना रुग्णांचा मृतू होतोय त्याचे काय? हा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे.

दमणच्या ब्रूक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.असा दावा केल्या जातं आहे, मात्र, शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले. पण जर कंपनी च्या मालकाला पोलीसांनी बोलावले तर भाजप नेत्यांच्या पोटात का दुखले? काय कंपनी च्या मालकाला सांगून महाराष्ट्रात इंजेक्शन चा तुटवडा तयार करून व भाजप तर्फे तो उपलब्ध करून त्याचे श्रेय घेण्याचा भाजप चा हा ड्रामा आहे का? हे शोधणे सुद्धा महत्वाचे आहे.

केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ब्रूक फार्मा कंपनीकडे साठा पडून होता. भाजपच्या नेत्यांनी कायदेशीरपणे या इंजेक्शन्सची निर्यात महाराष्ट्रात व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला मात्र जिथे महाराष्ट्र सरकारला ह्या इंजेक्शनच्या साठ्यांची आवश्यकता होती तिथे भाजप ने कोणत्या कायद्यांतर्गत हा साठा महाराष्ट्रासाठी विकत घेतला? काय खाजगी व्यक्तींना हा साठा विकत घेण्याचे किंव्हा सरकार ला ही इंजेक्शन न देता ती पक्षाच्या नेत्यांना विकण्याचे आदेश केंद्र सरकारने कंपनीला दिले होते का? हा प्रश्न उठत आहे.

राज्यात काही दिवसांपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होत आहे आणि राज्य सरकार रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात जातात आणि कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात येते पण महाराष्ट्र सरकारला मात्र ही इंजेक्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही याचा अर्थ काय आहे? म्हणजे भाजप तर्फे इंजेक्शन च्या नावावर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना वेठीस धरण्याचे काम दिसत असून कोरोना च्या काळात असे घाणेरडे राजकारण करून भाजप राज्यात सत्ता कशी काय स्थापन करू शकते? राजकारण करा पण कुणाच्या मरणावर राजकारण करू नका करण एकीकडे महाराष्ट्र रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपतोय आणि दुसरीकडे भाजप नेत्यांकडून इंजेक्शन चा साठा करून राजकारण होत असेल तर महाराष्ट्रातील जनता भाजप नेत्यांना माफ करणार नाही एवढ मात्र नक्की.

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर शहरात कोणत्याही रुग्णालयात बेड मिळाले नसल्याने एका महिलेचा अम्बुलँस मधेच मृतू.
Next articleनियुक्ती :- शोभा वाघमारे यांची महिला सेनेच्या उपजिल्हा अध्यक्षा म्हणून नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here